'स्वप्न झालं पूर्ण', परिणीती चोप्रा बनली मास्टर स्कूबा डायव्हर

मुंबई: परिणीती चोप्रा आता केवळ अभिनेत्रीच नाही तर मास्टर स्कूबा डायव्हर देखील बनली आहे. नऊ वर्षांच्या कठोर प्रशिक्षणानंतर तिने मास्टर स्कूबा डायव्हरची पदवी संपादन केली. तिने आपले नऊ वर्षांचे स्वप्न पूर्ण केल्याचे सांगितले आहे. मास्टर स्कूबा डायव्हर ही पदवी मिळाल्यानंतर तिने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचे प्रशिक्षण आणि ही पदवी मिळाल्याचा आनंद दिसत आहे.सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने स्कूबा डायव्हर बनण्याचे प्रशिक्षण कसे घेतले आहे. व्हिडीओमध्ये ती म्हणतेय की आयुष्य तेच आहे जे तुम्ही बनवता. छंद म्हणून जे सुरू झाले ते लवकरच माझ्या आवडीमध्ये बदलले. कामातून वेळ काढून, कठोर प्रशिक्षण आणि रेस्क्यू सेशनमधून जाणे, मला हे सगळं करायचं होतं. आज, नऊ वर्षानंतर मी शेवटी मास्टर स्कूबा डायव्हर ही पदवी मिळवली आहे.



व्हिडीओ शेअर करताना परिणीतीने इंस्टाग्रामवर लिहिले: "मी आता एक मास्टर स्कूबा डायव्हर झाली आहे. ही एक अतिशय वास्तविक भावना आहे. माझे नऊ वर्षांचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. अनेक वर्षांचे प्रशिक्षण आणि मेहनत फळाला आली आहे. परिणीतीच्या चाहत्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. व्हिडिओ पोस्टवर कमेंट करून तिच्या चाहत्यांनी कमेंटमध्ये लिहिले, "छान, अभिनयाच्या पुढे आयुष्य." दुसर्‍याने लिहिले, "व्वा..शेवटी एक बॉलीवूड स्टार जो सर्जनशील देखील आहे".कामाबद्दल बोलायचे झाले तर, परिणीती पुढे इम्तियाज अलीच्या 'चमकिला'मध्ये दिलजीत दोसांझसोबत दिसणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने