ज्येष्ठ नागरिकांना मदत हवी, मग ‘या’ हेल्पलाईनवर संपर्क साधा

 नागपूर : गेल्या काही दशकांमध्ये भारतातील वृद्धांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ नोंदवली गेली आहे. सध्या देशामध्ये सुमारे २३ कोटी लोकसंख्या ६० वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे. त्यांच्या अडचणी सोडविणे व गरजा भागवण्यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने राष्ट्रीय हेल्पलाईन (क्रमांक १४५६७) सुरू केली आहे. ती सकाळी ८ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत आठवड्यातील सर्व दिवस कार्यरत आहे.ही हेल्पलाईन जनसेवा फाउंडेशन, पुणेतर्फे चालवण्यात येत आहे. यावर राज्यभरातून पंचाहत्तर हजारांहून अधिक कॉल्स आले. त्यामधून ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रकारे मदत करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कनेक्ट सेंटरफिल्ड टीम, विविध शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, स्वयंसेवक आणि विविध सेवाभावी संस्था सातत्याने कार्यरत आहेत.ल्पलाइनमार्फत आरोग्य जागरूकता, निदान, उपचार निवारा, वृद्धाश्रम, डे-केअर सेंटर, पोषण विषयक, ज्येष्ठांसाठीचे उत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला, करमणूक आदीची माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे कायदेविषयक (वैयक्तिक आणि कौटुंबिकस्तरावर दोन्ही), विवाद निराकरण (मालमत्ता, शेजारी) आर्थिक, पेन्शन संबंधित सरकारी योजना याबाबत मार्गदर्शन केले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने