आई कुठे.. मध्ये मोठा ट्विस्ट! अनघाला दगा देणाऱ्या अभिनं लेकीला..

मुंबई:  'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. रोज नवा ट्विस्ट नवं वळण ही मालिका घेत आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत अनघाच्या डोहाळजेवणाचा घाट घातला होता. यावेळी अरुंधती म्हणजेच आई अभीचं बाहेर प्रेम प्रकारण सुरू असल्याचं सर्वांसमोर उघड करते. आपण गरोदर असताना आपल्या नवऱ्याचं बाहेर प्रेमप्रकारण आहे ही कळताच अनघा भर डोहाळ जेवणात चक्कर येऊन पडते अत्यंत कठीण परिस्थितीत तिची प्रसूती होते. त्यानंतर अभि आणि अनघामध्ये चांगलीच दरी पडलेली दिसते. आता मालिका अधिकच रंजक वळणावर आहे.अभिचे विवाहबाह्य संबंंध असल्याने अनघा आणि अभिषेक यांच्या नात्यात दुरावा आला आहे. अनघाच्या मनात अभि विषयी प्रचंड राग आहे. अनघा अभिला बाळाच्या जवळ देखील येऊ देत नाही. त्यामुळे अभि आणि तिच्यामध्ये छकुलीमुळे रोज भांडण होत आहे. त्यांच्यात प्रचंड तणाव असतानाच मालिकेत आता मोठा ट्विस्ट आला आहे.'आई कुठे काय करते' मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. अनघा बाळाला घेऊन कायमची माहेरी निघून जाणार अशी परिस्थिती दिसत असतानाच अभि आणि अनघा यांच्यात जोरदार खटके उडतात. अभि अनघाला म्हणतो 'तू जर बाळाला माझ्यापासून दूर केलंस तर मी वाट्टेल ते करीन'. त्याच रात्री अनघाला कळतं की बाळ तिच्याशेजारी नाही. ती घाबरते.

बाळाला घेऊन अभि कुठेतरी गेला या भीतीने सगळ्यांना ती जागं करते. सगळे अभिला शोधायला बाहेर पडतात. पण अभि बाहेर बागेत बाळाला खेळवत बसलेले असतात. हे पाहून सगळेच भावुक होतात. अभिषेक आणि अनघा यांच्यात वाद असला तरी लेकीसाठी मात्र त्यांचा जीव तळमळतो आहे. त्यामुळे हा भावनिक प्रसंग पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने