मला ठार मारण्यासाठीच माजी राष्ट्राध्यक्षांनी दहशतवाद्यांना पैसे दिले; इम्रान खान यांचा गंभीर आरोप

इस्लामाबाद : पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान  यांनी आता माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्यावर त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केलाय.यासोबतच इम्रान यांनी त्यांना हटवण्यासाठी प्लॅन सी तयार करण्यात आल्याचंही सांगितलं. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन न्यूजच्या वृत्तानुसार इम्रान म्हणाले, चार लोक माझ्या हत्येचा कट रचत आहेत. त्यांची नावंही रेकॉर्डिंगमध्ये आहेत. मी योग्य वेळी ती प्रसिद्ध करेन. पहिला प्लॅन उघड झाल्यानंतर माझ्या हत्येचा प्लॅन ए कधीच अंमलात आणला गेला नाही, तर दुसरा प्रयत्न वजिराबादमध्ये झाला, असा दावाही त्यांनी केलाय.इम्रान पुढं म्हणाले, आसिफ झरदारी यांनी माझ्यावर आणखी एक हल्ला करण्यासाठी दहशतवादी संघटनेला पैसे दिले होते. झरदारींकडून मदत मिळवणाऱ्या त्या चार लोकांच्या नापाक कारस्थानांबद्दल मी देशाला सगळं सांगत आहे. कारण, माझ्यावर पुन्हा हल्ला झाला तर लोकांना हल्लेखोरांबद्दल माहिती असावी, यासाठी मी देशवासियांना सांगत असल्याचं ते म्हणाले. जर 90 दिवसांत निवडणुका झाल्या नाहीत, तर उल्लंघन करणाऱ्यांना कलम 6 (उच्च देशद्रोह) ला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना दिला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने