“एकाच बेडवर…” अर्चना-सौंदर्याला शालीन भानोतने म्हटलं Lesbian, अभिनेत्याचं वादग्रस्त विधान

मुंबई:  टीना दत्ता व शालीन भानोत ही जोडी ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये कायमच चर्चेत राहिली आहे. मध्यंतरी टीना घराबाहेर पडल्यानंतर तिला पुन्हा हा खेळ खेळण्याची संधी देण्यात आली. जेव्हा ती या घरामध्ये परतली तेव्हा शालीन व टीनामध्ये वादाची ठिणगी पडली. पण आता पुन्हा एकदा शालीन व टीना एकत्र आले असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांचा रोमान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.बिग बॉस १६’च्या घरामध्येही नव्या वर्षाचं जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. घरामध्ये लाइव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शालीन व टीना एकमेकांच्या अधिक जवळ आले. घरातील इतर सदस्य या दोघांबाबत चर्चा करू लागले. दरम्यान घरात प्रत्येकजण आपल्या नात्याबाबत बोलत आहे हे पाहून शालीन सगळ्यांची समजूत काढताना दिसला.यादरम्यान तो जेव्हा अर्चना गौतमशी बोलायला गेला तेव्हा या दोघांमध्ये वाद रंगला. शालीन अर्चनाला म्हणाला, “टीना व माझ्यामध्ये फक्त मैत्री आहे. आम्ही दोघं एकमेकांच्या जवळ आहोत याचा अर्थ असा नाही की रिलेशनशिपमध्ये आहोत. तसं पाहायला गेलं तर तू आणि सौंदर्याही एकाच बेडवर चादर घेऊन झोपता. मग तुम्ही दोघी लेस्बियन होता का?”

शालीनचं हे बोलणं ऐकून अर्चनाचा राग अनावर होतो. शिवाय सौंदर्याही शालीनच्या बोलण्याला विरोध दर्शवते. शालीन जे बोलला आहे ते अर्चना निमृतला सांगत असते. यावेळी अर्चना म्हणते, “शालीनची मुलं जेव्हा शाळेत जात असतील तेव्हा त्याच्या मुलांनाही लोक ऐकवत असतील. तुमचे वडील ‘बिग बॉस’मध्ये काय करतात? असं लोक बोलत असतील.” अर्चना व शालीन एकमेकांच्या खासगी आयुष्याबाबत बोलताना दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने