माजी अध्यक्ष शरद यादव यांचे निधन; मुलीने ट्विट करत दिली माहिती

बिहार: जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे निधन झाले आहे. शरद यादव यांची मुलगी शुभशिनी यादव हिने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ते 75 वर्षांचे होते. शुभशिनीने आपल्या ट्विटमध्ये "पापा नहीं रहे" असे म्हटले आहे.शरद यादव यांचा जन्म 1 जुलै 1947 रोजी मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथील बंदई गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. एका शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या शरद यादव यांनी विद्यार्थी राजकारणातून सुरूवात करत राष्ट्रीय राजकारणात ठसा उमटवला. शरद यादव यांचे बिहारच्या राजकारणातही मोठे स्थान होते.शरद यादव यांना गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांच्यावर दीर्घकाळ उपचार सुरू होते. 2003 मध्ये जनता दलाच्या स्थापनेनंतर शरद यादव दीर्घकाळ पक्षाचे अध्यक्ष होते. ते सात वेळा लोकसभेचे खासदारही होते.मागील काही काळापासानू मात्र शरद सक्रिय राजकारणापासून दूर होते. त्यांनी बिहारच्या मधेपुरा लोकसभा मतदारसंघातून चार वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केले. दोनदा ते मध्य प्रदेशातील जबलपूरमधून खासदार म्हणून निवडून आले.

एकदा उत्तर प्रदेशातील बदायूंमधून लोकसभेत पोहोचलो होते. शरद यादव हे बहुधा भारतातील पहिले राजकारणी होते जे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या तीन राज्यांमधून लोकसभेवर निवडून आले होते. शरद यादव हे आणीबाणीच्या काळात ते तुरुंगातही गेले.शरद यादव यांनी भारत सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांच्या वडिलांचे नाव नंद किशोर यादव आणि सुमित्रा यादव होते. त्यांनी जबलपूरच्या रॉबर्टसन कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी मिळवली. त्यांची बहुतांश राजकीय कारकीर्द बिहारमध्ये होती. 15 फेब्रुवारी 1989 रोजी रेखा यादवसोबत त्यांचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने