अभिनेता शशांक केतकर अडकणार घोटाळ्यात? त्या पोस्टची होतेय चर्चा..

मुंबई: 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला 'श्री' म्हणजे शशांक केतकर अजूनही प्रेक्षकांना तितकाच भावतो. सध्या त्याची मालिका सुरू नसली तरी सोशल मिडियावर मात्र तो प्रचंड सक्रिय असतो. अनेकदा तो त्याला खटकणाऱ्या विषयांवर जाहीरपणे बोलतो. त्यामुळे शशांकच्या पोस्टकडे सर्वांचेच लक्ष असते. नुकतीच शशांकने एक पोस्ट शेयर केली, ज्याने सर्वांचेच लक्ष वेधले आणि शशांक कोणत्या घोटाळ्यात अडकणार आहे की काय अशी चर्चा सुरू झाली.ही पोस्ट एका घोटाळ्याची आहे. 'स्कॅम २००३' अशी एक पाटी घेऊन शशांक उभा आहे. हा कोणताही घोटाळा नसून ही एक घोटाळ्याची गोष्ट आहे, जी वेब सिरिज स्वरूपात आपल्या समोर येत आहे. या वेब सिरिज मध्ये शशांक महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शशांकने एक पोस्ट शेयर करत नुकतेच ही जाहीर केले आणि त्यांच्या चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतोय.२०२० मध्ये आलेल्या 'स्कॅम १९२२' या वेब सिरीजने ओटीटी क्षेत्रात धुमाकूळ घातला. प्रसिद्ध दिग्दर्शक हन्सल मेहता यांनी काढलेल्या या सिरीजने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यातील मुख्य अभिनेता प्रतिक गांधीच्या  अभिनयाने तर सर्वांचे मन जिंकले. आता हन्सल मेहता हे आणखी एका घोटाळ्यावर सिरीज घेऊन येत आहेत. आणि यात मराठी अभिनेता, सर्वांचा लाडका श्री म्हणजेच शशांक केतकरही भूमिका साकारणार आहे. शशांकने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत  ही गूडन्यूज दिली आहेशशांकने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले, ' २०२२ वर्ष हे मस्तच गेलं आणि २०२३ हे नवीन वर्षही छान असेल.' शशांकने एक फोटो पोस्ट केला आहे. त्यावर क्लॅपबोर्ड दिसत असून SCAM 2003 असे लिहिले आहे. हन्सल मेहता यांचेही नाव आहे. २००३ मध्ये झालेला तेलगी घोटाळा प्रचंड गाजला होता. तेलगी घोटाळ्याची संपूर्ण कहाणी हन्सल मेहता आपल्या सिरीजमधून दाखवणार आहेत. शशांक सध्या स्टार प्रवाह वरील 'मुरांबा' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने