हिंदू,मुस्लिम झाले..आता उर्फीनं शीख धर्मियांवर केलं नवं ट्वीट,म्हणाली..

मुंबई: आपल्या अतरंगी फॅशन स्टाइलमुळे उर्फी जावेद नेहमी चर्चेत असायचीच पण जेव्हा उर्फीच्या कपड्यावंर राजकीय पक्षांकडून आक्षेप घेतला गेला तेव्हा मात्र जोरदार वाद रंगलेला गेल्या काही दिवसांपासून आपण सगळे पाहत आहोत. चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात रंगलेला वाद थेट महिला आयोगाकडे तक्रार करण्यापर्यंत पोहोचला. यांच्यातील तू-तू,मै-मै नं महाराष्ट्राचं मात्र मस्त मनोरंजन झालं.चित्रा वाघ यांनी उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच त्यांनी उर्फीला कपडे नीट घातले नाहीत आणि सार्वजनिक ठिकाणी तिनं सुरु केलेला नंगा नाच जर थांबवला नाही तर थोबाडीतही मारेन असं म्हटलं होतं. त्यानंतर उर्फीनं तर थेट चित्रा वाघ यांचा 'सासू' म्हणून उल्लेख केला होता. या वादानंतर उर्फीनं पोलिसांकडे धाव घेतली होती आणि पोलिसांनी तिचा जबाबही नोंदवला होता.


उर्फी सध्या पोलिसांकडे जबाब नोंदवल्यानंतर ट्वीटरवर भलतीच सक्रिय पहायला मिळते आहे. याआधी तिनं हिंदू-मुस्लिम धर्मांसंदर्भात ट्वीट करत खळबळ उडवून दिली होती.हिंदू धर्माबद्दल ट्वीट करताना उर्फी म्हणाली होती,''प्राचीन काळी हिंदू स्त्रिया अशाप्रकारे पेहराव करायच्या. हिंदू खूप उदारमतवादी होते,शिक्षित होते,ते स्त्रियांना त्यांच्या आवडीचे कपडे निवडण्याची मुभा द्यायचे. महिलांचा खेळात आणि राजकारणात सक्रिय सहभाग असायचा. तेव्हा जा आणि आधी भारतीय संस्कृतीला समजून घ्या''.तिनं ट्वीटसोबत जुने शिल्प आणि हिंदू स्त्रीयांचा प्राचीन काळातील पेहराव दाखवणारा एक फोटो शेअर केला होता.हिंदू धर्मानंतर उर्फीनं आपला मोर्चा वळवला होता मुस्लिम धर्माकडे. उर्फी स्वतः मुस्लिम असूनही तिनं मुस्लिम धर्मासाठी खूप कटूता आपल्या ट्वीटमधून व्यक्त केली होती. तिनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं,''मुसलमान पुरुषांना वाटतं की त्यांच्या पत्नीवर त्यांचा मालकी हक्क आहे''.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने