Top 3 मध्ये असतील 'हे' स्पर्धक, बोलता-बोलता सिमी ग्रेवालनी सांगून टाकली नावं...

मुंबई:  बिग बॉस १६ चा नुकताच प्रसारित झालेला भाग खूपच मजेदार राहिला. या भागात स्पर्धकांच्या कुटुंबियांनी बिग बॉसच्या घरात हजेरी लावलेली पहायला मिळाली. सुम्बुलचे मोठे काका आले होते,ज्यांनी आपला खास अंदाज दाखवत बिग बॉसच्या टीआरपीला चारचॉंद लावले. त्यांचे विनोद ऐकून घरातील गंभीर वातावरण एकदम कॉमेडी शो मध्ये बदलून गेलं.यानंतर सिमी ग्रेवाल यांनी घरात एन्ट्री केली. सिमी ग्रेवाल यांनी तब्बल १६ वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केलेलं पहायला मिळालं. त्या 'रेंडेवद विद सिमी ग्रेवाल' या शो ला होस्ट करण्यासाठील ओळखल्या जातात. सिमी ग्रेवाल यांच्या येण्यानं घराचं वातावरण पूर्ण बदलून गेलं. सिमी ग्रेवाल यांनी स्पर्धकांना खूपसारे प्रश्न विचारले. आणि बोलता बोलता त्यांनी टॉप ३ स्पर्धकांचा खुलासा केला.



सिमी ग्रेवाल यांनी पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली होती. त्यांनी घरात प्रवेश करताच स्पर्धकांना विविध प्रश्न विचारुन बोलतं केलं. आणि खुलासा केला की त्या एमसी स्टॅनच्या खूप मोठ्या चाहत्या आहेत. त्यांनी स्टॅनच्या कामाची आणि त्याच्या स्वभावाची खूप प्रशंसा केली. एमसी स्टॅनच्या जीवनप्रवासानं आपण प्रेरित झाल्याचं देखील त्या म्हणाल्या..जे यश स्टॅननं मिळवलंय ते प्रशंसनीय आहे असं देखील विधान त्यांनी केलं.यानंतर सिमी ग्रेवाल यांनी स्टॅनला विचारलं की, 'तू तुझ्या यशाचं श्रेय कोणाला देशील?' तेव्हा त्यानं देवाला आणि आईला असं म्हटलं.आणि हे ऐकल्यावर त्याची प्रशंसा करताना सिमी ग्रेवाल थकल्या नाहीत.

पुढे सिमी ग्रेवालनी प्रियंका चाहर चौधरीला देखील काही प्रश्न केले. 'तिला स्टरडम आणि प्रेम यातनं कोणा एकाला निवडायचं असेल तर ती काय करेल' असा प्रश्न सिमी यांनी प्रियंकाला केला. तेव्हा प्रियंकानं, 'प्रेमाची निवड करेन' असं म्हटलं. आणि हाच प्रश्न शिवला विचारला तेव्हा त्यानं 'करिअर' असं उत्तर दिलं.बिग बॉस शो ची प्रत्येक अपडेट देणाऱ्या एका साइटनं दिलेल्या बातमीतून समोर आलं आहे की, सिमी ग्रेवाल यांनी शो मध्ये टॉप ३ कोण असतील यांच्या नावांचा बोलता बोलता खुलासा केला आहे. सिमी यांनी जेव्हा बिग बॉस १६ च्या विजेत्यांविषयी बोलायला सुरुवात केली तेव्हा कॅमेरा प्रियंका,शिव आणि स्टॅनवर वळवला गेला. आणि यामुळेच आता टॉप ३ हे तिघे असतील या चर्चेला उधाण आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने