'गरज सरो..वैद्य मरो..',गोल्डन ग्लोब जिंकल्यावर राजामौलींंनीही बॉलीवूडला दाखवली लायकी..म्हणाले..

मुंबई : 80 व्या गोल्डन ग्लोब्समध्ये भरघोस यश मिळवलेल्या आरआरआरची सध्या जोरदार चर्चा आहे. सिनेनिर्माता राजामौली यांच्या एका विधानावरनं मात्र चर्चेचा सुर आता बदलू लागलाय. कारण राजामौली यांनी त्यातनं बॉलीवूडला सुनावल्यानं अनेकजण नाराज झाल्याचं बोललं जात आहे .राजामौली यांनी काही दिवसांपूर्वीच गिल्ड ऑफ अमेरिका मध्ये आपल्या सिनेमाच्या स्क्रिनिंग वेळेस हे विधान केलं आहे.

रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर अभिनित आरआरआर सिनेमा म्हणजे दोन योद्धांची कहाणी आहे, जे सिनेमात पारतंत्र्यात असलेल्या भारतात ब्रिटिश अधिकाऱ्याविरोधात लढताना आपल्याला दिसले. .राजामौली यांनी आपल्या आरआरआर सिनेमाविषयी बोलताना म्हटलं आहे की, ''माझा सिनेमा बॉलीवूड सिनेमा नाही, हा एक भारताच्या दक्षिणेकडचा तेलुगु सिनेमा आहे. जिथे माझी पाळमुळं जोडली आहेत. सिनेमात थोडासा विरंगुळा म्हणून किंवा तुम्हाला डान्स आणि म्युझिक दाखवायला या गाण्याचा समावेश मी केला नव्हता तर सिनेमाची कथा पुढे न्यायला मी या गाण्याचा वापर केला. मी माझ्या सिनेमात कथेची गरज म्हणून गाणं टाकतो. जर सिनेमाच्या शेवटी तुम्ही म्हणालात की ३ तास कसे गेले कळलंच नाही तरच मी एक यशस्वी निर्माता ठरू शकतो''.नुकतेच एसएस राजामौली यांना आरआरआर या सिनेमातील त्यांच्या नाटू नाटू गाण्यासाठी गोल्डन ग्लोबनं गौरविण्यात आलं. गाण्यात रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांचा दमदार डान्स आणि त्यांच्या मैत्राचं सेलिब्रेशन दाखवण्यात आलं आहे. गोल्ड ग्लोबमध्ये जिंकताना या गाण्यानं टायलर स्विफ्ट,रिहाना आणि लेडी गागा यांच्या गाण्याला हरवलं आहे.नाटू नाटू गाणं आता ऑस्करच्या शर्यतीतही पोहोचलं आहे. याविषयी बोलताना रामचरण आणि ज्यु.एनटीआरा म्हणाले होते की,''जर आम्ही ऑस्कर जिंकलो तर आम्ही ऑस्करच्या मंचावरच डान्स करु''. हे गाणं संगीत दिग्दर्शक एमएम केरावनी यांनी संगीतबद्ध केलं आहे आणि काल भैरव आणि राहुल सिप्लिंगुज यांनी ते गायलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने