ST चे चाक आले ट्रॅकवर

कोल्हापूर : कोरोनाकाळात तसेच एसटी विलीनीकरण संपाच्या काळात एसटी महामंडळाची घसरलेली प्रवासी संख्या तसेच घसरलेला महसूल पुन्हा वाढू लागला आहे. एसटीने नव्या गाड्या कंत्राटी तत्त्वावर घेतल्यानंतर दिवसाकाठी ५० लाखाने प्रवासी वाहतूक होत आहे, तर सरासरी २२ कोटी प्रतिदिन महसूल मिळत आहे. कोरोनापूर्वी दिवसाला ६६ लाख प्रवाशांची वाहतूक, तर २६ कोटी रुपये महसूल मिळत होता. त्याच प्रवासी संख्येत व महसुलात मध्यंतरी निम्म्याने घट झाली होती.सर्वच वर्गातील प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची खात्री देणारे एसटी महामंडळ गेल्या काही वर्षात तोट्याच्या गर्तेत सापडले आहे. यात कोरोनाकाळात जवळपास दोन वर्षे रोजची प्रवासी वाहतूक खंडित झाली. त्यानंतर प्रवासी सेवा सुरू झाली.जेमतेम चार-सहा महिने होताच विलीनीकरण मागणीच्या संप सुरू झाल्याने सहा महिने व प्रवासी वाहतूक ठप्प झाली. या काळात एसटीचा प्रवासी वर्ग दुरावला. त्या संपानंतर प्रवासी सेवा पुन्हा सुरू झाली. यात प्रतिदिन जेमतेम ३५ लाख प्रवासी सरासरी १२ कोटींचा रुपयांचा महसूल एसटीला मिळत होता.याच संप काळात कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला. कर्मचाऱ्यांना अभूतपूर्व वेतन वाढ झाली. एसटीच्या अार्थिक ताण वाढला. मिळणारा महसूल कमी झाला. यात राज्यभरात टोल कर तसेच वाढता इंधन खर्च भागविणेही मुश्कील होते.राज्यशासनाने दर महिन्याच्या सात तारखेला वेतन देण्याची हमी घेतली. सेवा सुरू झाली. याच पाठोपाठ एसटी महामंडळाने राज्यभरात ५०० वर गाड्या खासगी कंपन्यांकडून घेतल्या आहेत. दिवाळी सणापासून या गाड्याही सेवेत आल्या. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत एसटी प्रवासी संख्येत व पर्यायने महसुलात वाढ झाली आहे.

प्रवासी व महसूल वाढीचा आलेख असा

महिना प्रवासी संख्या प्रवासी महसूल

एप्रिल १९ लाख ११ कोटी

मे ३३ लाख १८ कोटी

जुलै ३७ लाख १७ कोटी

आॅगस्ट ४३ लाख १९ कोटी

सप्टेंबर ५१ लाख २० कोटी

आक्टोबर ४५ लाख २१ कोटी

नोव्हेंबर ५२ लाख २३ कोटी

डिसेंबर ५० लाख २२ कोटीटिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने