Vaidehi Parashurami ने आकाश ठोसरला पाहून फोडली किंकाळी..पुढे जे घडलं ते..

मुंबई: सध्या मराठी इंडस्ट्रीत वैदेही परशुरामी हे नाव भलतंच चर्चेत पहायला मिळतं. तिचं सुंदर दिसणं हेच त्याचं एकमेव कारण नाही तर यामागे वैदेहीचा सोज्वळ स्वभाव आणि गुणी अभिनेत्री म्हणून तिची इंडस्ट्रीत रजिस्टर झालेली ओळख ही कारणं देखील तितकीच महत्त्वाची आहेत. वैदेहीनं वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका आतापर्यंत केल्या आहेत आणि त्यामुळे खूप कमी वेळात तिनं आपलं असं एक स्थान मराठी इंडस्ट्रीत निर्माण केलं आहे.'काशिनाथ घाणेकर...' सिनेमातील तिच्या अभिनयानं अनेकांना ती भावली. तर अलिकडेच रिलीज झालेल्या काही विनोदी धाटणीच्या सिनेमात ती दिसली अन् तिच्या कॉमेडी टायमिंगलाही अनेकांनी पसंत केलं. सध्या ती आपल्या 'जग्गू आणि ज्युलिएट' या आगामी सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहे. यादरम्यान तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहून सगळेच थोडे हैराण झाले आहेत.असं काय घडलं नेमकं चला जाणून घेऊया.

आता आपल्या सर्वांना माहित आहे की ग्लॅमरच्या दुनियेत खूप कमी स्टार्स एकमेकांचे मित्र असतात..बहुतांशी स्टार्समधनं तर विस्तवही जात नाही. पण असेही काही स्टार्स आहेत ज्यांच्यामध्ये खूप घनिष्ट मैत्री पहायला मिळते.हे असे कलाकार अगदी रोज एकमेकांना भेटतात अशातला काही भाग नाही पण एकमेकांविषयी यांच्या मनात प्रेम आणि आदरभाव नक्कीच असतो. अशीच काहीशी मैत्री आहे सैराट फेम आकाश ठोसर आणि वैदेही परशुरामी यांच्यात आहे.सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात वैदेहीनं आकाशला पाहून जोरदार किंकाळी फोडल्याचं दिसत आहे.नुकताच झी समुहाचा महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? हा लोकप्रिय पुरस्कार सोहळा पार पडला. त्या सोहोळ्यात जवळपास मराठीतील सर्वच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आणि याच सोहळ्यात वैदेही आणि आकाश एकमेकांच्या समोर आले आणि तो किंकाळीचा प्रकार सगळा घडला.त्याचं झालं असं की वैदेही रेड कार्पेटवर माध्यमांशी संवाद साधत असतानाच समोरून एन्ट्री झाली आकाश ठोसरची. आणि त्याला पाहताच वैदेहीनं मुलाखत देणं सोडून जोरदार किंकाळी फोडली आणि आकाशला घट्ट मिठी मारली.

अर्थात यात सगळीकडे आनंदी आनंद होता. कारण दोघे तब्बल एक वर्षांनी भेटत होते. दोघे चांगले मित्र आहेत,भेटणं होत नसलं तरी फोनवर ते तासनतास गप्पा मारतात असं वैदेही स्वतः त्यावेळी म्हणाली. वर्षभरापूर्वी ज्या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर ते भेटले होते तिथेच त्यांची वर्षभरानंतर भेट होत होती असं देखील दोघांनी नमूक केलं.यावेळी दोघांनीही मजेमेजत म्हटलं,''कोणी दिग्दर्शक आम्हाला पाहत असेल तर पहा आमची जोडी किती छान दिसतेय. तेव्हा नक्कीच आमचा विचार करू शकता. जॉनर कोणताही असो फक्त एकत्र काम करायला मिळणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे''वैदेही आणि आकाशनं खरंतर याआधी एकत्र काम केलं होतं. 'एफ्यू' असं या सिनेमाचं नाव आहे. आकाशचा 'सैराट' नंतरचा तो दुसरा सिनेमा होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने