फराह-साजिदच्या डोक्यावर जेव्हा छप्पर नव्हतं, तेव्हा जुहू चौपाटीवर दोघे..

मुंबई: बिग बॉस १६ मध्ये फराह खानने एंट्री केलीय. फराह खानने नुकतंच बिग बॉसच्या घरात वाढदिवस साजरा केला. फराह बिग बॉस मधील इतर स्पर्धकांसोबत वेळ घालवत असते. त्यावेळी तिने साजिद आणि तिचा स्ट्रगलचा काळ सांगितला. फराह आणि साजिद सध्या जरी लोकप्रिय असले तरीही दोघांचं बालपण अत्यंत दुःखात गेलंय. बिग बॉस १६ च्या एका एपिसोड मध्ये फराहने अत्यंत वेदनादायी कहाणी सांगितली.फराह आणि साजिदचे वडील कामरान खान हे प्रसिद्ध दिग्दर्शक होते. सगळं सुरळीत असताना त्यांचा एक सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. त्यानंतर कामरान यांच्या आयुष्याने एक गंभीर वळण घेतले. सिनेमातील आपली सर्व बचत गमावल्यानंतर, त्यांनी स्वतःला दारुच्या व्यसनात बुडवून घेतल. 


याचा गंभीर परिणाम कामरान यांच्या आयुष्यावर झाला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.परिस्थीती इतकी बेकार कि तेव्हा फराहच्या कुटुंबाकडे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठीही पैसे नव्हते. फक्त ३० रुपये शिल्लक होते. अशावेळी सलमान खानचे वडील सलीम खान यांनी फराहच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली. या पैशातून त्यांनी सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार तर पार पाडलेच, याशिवाय काही दिवसांसाठी खायचे सामान विकत घेतले.साजिद खान बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये म्हणाला कि,"तो आणि फराह जुहू बीचवर नाचायला जायचे. नाचल्यावर लोकं जे काय थोडेफार पैसे देतील त्यातून ते पैसे कमवायचे." अशाप्रकारे या बहीण - भावाने आयुष्यात असाही एक वाईट काळ बघितला आहे. साजिद खान बिग बॉस १६ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी आहे. सध्या बिग बॉस १६ च्या घरात फॅमिली वीक सुरु असून फराह खान लाडक्या भावाला सपोर्ट करायला घरात दाखल झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने