पोरांचा गृहपाठही करतंय ChatGPT; अखेर शिक्षण विभागानं घेतला मोठा निर्णय

न्यूयॉर्क: गेल्या काही दिवसांपासून चॅटजीपीटी (ChatGPT) वर बरीच चर्चा सुरू आहे. काही लोक हे लवकरच गुगलला संपवणार असे देखील म्हणत आहेत तर काही लोक याला मानवांसाठी धोका असल्याचे सांगत आहेत. आगामी काळात ChatGPT नागरिकांच्या नोकऱ्यांसाठी धोकादायक ठरणार असल्याची चर्चा आहे. मात्र, लोक त्याचा गैरवापर करू लागले आहेत.याचा गैरवापर होत असल्यामुळे न्यूयॉर्कमध्ये चॅटबॉट ब्लॉक करण्यात आले आहे. न्यूयॉर्क सिटी डिपार्टमें ऑफ एज्युकेशनने ChatGPT चा एक्सेस ब्लॉक केला आहे. शाळेतील मुले याचा चुकीच्या पद्धतीने वापर करत होती.



याा ब्लॉक करण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे हे चॅटबॉट वापरून यूजर्स फक्त आवाजाच्या मदतीने उत्तरं मिळवता येतात. या चॅटबॉटकडून निबंध देखील लिहून घेता येतात. त्यामुळेच एज्युकेशन डिपार्टमेंटने यावर बंदी घातली आहे.CNET ने दिलेल्या रिपोर्टनुसार स्कूल स्टिस्टम चे प्रवक्ते Jenna Lyle यांनी सांगितलं की, मुलांच्या अभ्यासावर वाईट प्रभाव पहाता यावर बंदी घालण्यात आली आहे. मुलांच्या प्रश्नांना ChatGPT सोपे उत्तरं देऊ शकते, प्रवक्त्याचं म्हणणं आहे की, यामुळे कठिण प्रश्न सोडवण आणि क्रिटिकल थिंकिंग हे कौशल्य विकसीत होणार नाही. जेकी शैक्षणिक आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी गरजेचे आहे.

विद्यार्थी आणि फॅकल्टी हे ChatGPT शाळेच्या सीस्टीमशी जोडलेले नाहीत अशा डिव्हाइसवर वापरू शकतात. न्यूयॉर्क हे पहिले शहर आहे जेथे ChatGPT ब्लॉक करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात इतरही अनेक ठिकाणी ते ब्लॉक केलं जाऊ शकतं. ChatGPT हे चॅटबॉट मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. हे गुगलपेक्षा खूप वेगळे टूल आहे.गुगल हे सर्च इंजन प्लॅटफॉर्म आहे तर ChatGPT हे आर्टिफीशियल इंटेलिजन्स (AI) बेस्ड चॅटबॉट आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही विचारलेल्या कोणत्याही प्रश्नावर वेगवेगळी उत्तर दिसत नाहीत. गुगल प्रमाणे वेगवेगळ्या लिक्स देण्या एवजी, हे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून उत्तर देतं. या चॅटबॉटला लोकांकडून चांगली पसंती मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने