'शाहरुखचा हेवा...'राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही 'पठाण'ची भुरळ...

मुंबई: बॉलिवूडवरील बॉयकॉटच ग्रहण हे पठाणमुळे सारावल्याचं चित्र सध्या सर्वत्र पहायला मिळत आहे. शाहरुख खानच्या पठाण चा बोलबाला दिसत आहे. शाहरुखने चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर आगमन केलं आणि आता या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड तोडले.शाहरुखच्या चाहत्यांमध्ये पठाणची क्रेझ किती आहे हे तर चित्रपटाची कमाईच सांगत आहे. त्याच बरोबर अनेक कलाकारांनीही पठाण चित्रपटावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातच आता राजकारणी मंडळींनाही पठाणची भुरळ पडल्याच दिसतयं.राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पठाण चित्रपटावर प्रतिक्रिया दिली. त्यांनीही पठाण चित्रपट पाहिला. त्यांना हा चित्रपट खुप आवडला. त्यामुळे या चित्रपटातची प्रशंसा करण्यापासून त्या स्वत:ला रोखू शकले नाहीत. त्याचबरोबर त्या शाहरुखच्या फॅन असल्याचही त्यांनी सांगितलं.यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी Unfiltered by Samdish या एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पठाण चित्रपटाबद्दलच्या वादावरही त्याचं मत मांडलं. काही लोकांना शाहरुखच्या यशाचा हेवा वाटतो. तो भारताचा सुपरस्टार आहे, तो या चित्रपटात दिसला आहे. त्याचबरोबर या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिकाही पडद्यावर कुठं कमी नसल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'शाहरुख खान हा भारताचा सुपरस्टार आहे. या चित्रपटात तो खूपच अप्रतिम आहे. तो आणि दीपिका एकत्र अप्रतिम दिसत आहेत. मला असे वाटते की काही लोकांना शाहरुख खानचा हेवा वाटतो.त्यांना या मुलाखतीत विचारण्यात आले की, पठाण चित्रपटाला मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी निषेध केला होता. याच तुम्ही समर्थन करतात का? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'अजिबात नाही. मी अशा गोष्टींचे समर्थन करत नाही. अशा वेळी मी फक्त फोन उचलते आणि त्यांना कॉल करते आणि म्हणते, भाऊ तुला काय झाले?'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने