विना अंघोळ करता देवधर्म करणं अर्चना अन् प्रियंकाला भोवलं.. नेटकऱ्यांनी झाडलं..

मुंबई:  बिग बॉस 16' च्या स्पर्धक प्रियांका चहर चौधरी आणि अर्चना गौतम यांनी प्रेक्षकांना त्रास दिला आहे, त्यांच्या कृत्यांमुळे ते देखील ट्रोलच्या निशाण्याखाली आले आहेत. अलीकडेच 'बिग बॉस'च्या घरात प्रियांका आणि अर्चना सूर्याला पिण्याच्या ग्लासमध्ये पाणी देताना दिसल्या होत्या आणि अभिनेत्रींच्या या कृतीवर नेटिझन्स खूप नाराज आहेत आणि यासाठी ते प्रियांका आणि अर्चना यांना फटकारत आहेत.सलमान खानचा रिअॅलिटी शो बिग बॉस 16 मध्ये रोज नवनवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. एका बाजूला मंडलीतील चार लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला टीना दत्ता-प्रियांका चहर चौधरी आहेत. या लोकांमध्ये नेहमीच काही ना काही भांडण होतांना दिसतय. घरात कोण कधी कसला ड्रामा करेल काही सांगता येतं नाही.
त्यातच आता प्रियांका आणि अर्चना यांनी असं काही केलं की त्यामुळं दोघींनाही जोरदार विरोध करत ट्रोल करण्यात येत आहे. त्याच झालं असं की, प्रियांका आणि अर्चना यांनी नुकतच सूर्याला अर्घ देतांना दिसल्या. मात्र यावेळी त्यांनी आंघोळ केलेली नव्हती. अंघोळ न करता अर्घ देताना त्या दिसल्या होत्या, त्यानंतर त्यांच्यावर धार्मिक भावनांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याचबरोबर त्या केवळ दिखावा करण्यासाठीच असं कृत्य करतात असंही प्रेक्षक बोलतं आहेतं.जर प्रियंका आणि अर्चना खरचं असं काही करायचे आहे तर त्यांनी ते पुर्ण श्रद्धेने करायला हवे. आंघोळीनंतरही सूर्याला अर्घ ते देवु शकतात. प्रियांका आणि अर्चना अनेकदा सूर्याची पूजा करताना दिसतात, परंतु लोक ज्या पद्धतीने पूजा करत आहेत त्यावरून त्या ढोंग वाटतं आहे. त्यामुळं नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने