कोण आहे हा ‘मिस्ट्री मॅन’? ज्याच्यासोबत सारा अली खानने केले नवीन वर्षाचे सेलिब्रेशन

मुंबई  : बॉलिवूडमधील अभिनेत्री सारा अली खानचे नाव अभिनेता कार्तिक आर्यनसोबत जोडले गेले आहे. आता पुन्हा एकदा सारा अली खानच्या नात्याची चर्चा रंगली आहे. याला कारण आहे साराचा फोटो. अलीकडेच सारा अली खानने तिच्या नवीन वर्षाच्या सुट्टीचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती कॉफी पिताना तर कधी आले विकत घेताना दिसत आहे, मात्र चाहत्यांच्या नजरा साराच्या फोटोवर खिळल्या आहेत ज्यामध्ये ती एका मिस्ट्री मॅनसोबत स्वॅगमध्ये पोज देत आहे.सारा अली खानच्या समोर काळ्या रंगाच्या हुडीने चेहरा लपवलेला एक माणूस आहे, जो बराचसा कार्तिक आर्यनसारखा दिसतोय. या फोटोवर चाहते आता जोरदार कमेंट करत आहेत. हे फोटो समोर आल्यानंतर पुन्हा एकदा साराचे नाव कार्तिक आर्यनसोबत जोडले जात आहे.सारा अली खानने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती स्वॅगमध्ये जबरदस्त पोज देत आहे. एका फोटोत सारा तिच्या मैत्रिणीसोबत मस्ती करत आहे तर दुसऱ्या फोटोत ती दुकानातून आले विकत घेत आहे. मात्र, सर्वांचे लक्ष साराच्या त्या फोटोकडे लागले आहे ज्यात ती एका मिस्ट्री मॅनसोबत पोज देत आहे. साराने लाल रंगाचा टॉप आणि ब्लॅक ट्राउजर घातला आहे. यासोबतच तिने सिल्वर जॅकेट आणि सनग्लासेससह लूक पूर्ण केला आहे. साराच्या समोर फुल ब्लॅक आउटफिट मध्ये एक मुलगा उभा आहे. ज्यामध्ये त्याचा चेहरा टोपीने झाकलेला आहे.

मिस्ट्री मॅन साराच्या सोबत उभा असलेला पाहून चाहते जोरदार कमेंट करत आहेत. सारासोबत दिसणारी ही व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. तो दुसरा कोणी नसून कार्तिक आर्यन असल्याचा अंदाजही चाहते व्यक्त करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, “सारासोबत दिसणारा मिस्ट्री मॅन दुसरा कोणी नसून कार्तिक आर्यन आहे". त्याचबरोबर काही यूजर्स याला साराचा भाऊ इब्राहिम अली खान म्हणत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने