डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंपनीला 130 कोटींचा दंड; कारण...

 वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची रिअल इस्टेट कंपनी द ट्रम्प ऑर्गनायझेशन आणि त्याच्याशी संबंधित अन्य दोन कंपन्या कर फसवणुकीसह अनेक गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्या आहेत. त्यामुळे न्यूयॉर्क कोर्टाने शुक्रवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या वडिलोपार्जित व्यवसायाला 1.6 मिलियन डॉलर अर्थात १३० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.हा दंड ट्रम्प यांच्या कंपनीसाठी फारसा मोठा नसला तरी, पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये परतण्यासाठी आशावादी असलेले ट्रम्प यामुळे पुन्हा कायदेशीर पेचप्रसंगात अडकू शकतात.ट्रम्प कॉर्पोरेशन आणि ट्रम्प पेरोल कॉर्प या 'द ट्रम्प ऑर्गनायझेशन'च्या संस्था आहेत. खोट्या व्यवसाय नोंदींद्वारे कर चुकवण्याच्या उद्देशाने कट रचण्यात दोन्ही कंपन्या गेल्या महिन्यात दोषी आढळल्या होत्या. सुमारे महिनाभर चाललेल्या या खटल्यात ज्युरींनी ट्रम्प यांच्या कंपन्यांवर १७ मुद्द्यांवरून ठपका ठेवला.डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप झाले नसले तरी ज्युरींच्या या निर्णयामुळे त्यांची प्रतिमा नक्कीच खराब झाली आहे. कारण, ट्रम्प यांनी 2024 साली अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.मॅनहॅटनच्या कोर्टाने 'द ट्रम्प ऑर्गनायझेशन'वरील करचुकवेगिरीसह अनेक आरोप खरे ठरवले. कोर्टाने आपल्या निकालात म्हटले की, कंपनीने अनेक अधिकाऱ्यांना लक्झरी अपार्टमेंट्स, मर्सिडीज बेंझ आणि ख्रिसमससाठी अतिरिक्त रोख रकमेवरील कर चुकविण्यास मदत केली आहे. याआधी ज्युरींनी ट्रम्प यांच्या कंपनीलाही बिझनेस फ्रॉडसाठी दोषी ठरवलं असून, त्यासाठी 13 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

'द ट्रम्प ऑर्गनायझेशन'चे व्यवस्थापन सध्या डोनाल्ड ट्रम्प यांची दोन मुले डोनाल्ड ज्युनिअर आणि एरिक सांभाळत आहेत. २००५ ते २०२१ या काळात या दोघांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेली नुकसानभरपाई लपवली होती, असा आरोप आहे. या घोटाळ्यात सीएफओ अॅलन वेसलबर्ग यांची बाजू घेतल्याप्रकरणी त्यांना मंगळवारी पाच महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच त्याला 2 मिलियन डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने