श्रीलंकेवर दमदार विजयांनंतर टीम इंडियाचा मराठी गाण्यावर डान्स

मुंबई : नुकत्याच झालेल्या श्रीलंकेसोबतच्या तीन एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने श्रीलंकेवर ३-० ने दमदार विजय मिळवला आहे.भारतीय संघाच्या या मोठ्या विजयानंतर टीम इंडियावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.भारतीय संघाच्या या विजयानंतर अनेक मिम्स आणि व्हिडिओ व्हायरल होत असून, भारतीय संघाचा माजी स्टार खेळाडू आणि राज्यसभेचे खासदार हरभरजन सिंग यांनी ट्वीटवर एक फनी व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रित बुमराह यांचे मुखवटे लावण्यात आले आहेत. तसेच हे सर्व खेळाडू मराठीतील सुपरहिट गाणे ह्रदयी वसंत फुलतांना या गाण्यावर तुफान संगीत वाद्य वाजवतांना दिसून येत आहे.हा व्हिडिओ शेअर करताना हरभजन सिंग यांनी लिहिले आहे की, श्रीलंकेवरील मोठ्या विजयानंतर तिरुअनंतपुरममधील पार्टी सीन असा उल्लेख केला आहे.तसेच या व्हिडिओच्या बॅकग्राउंंडला मराठीतील सुपरहिट चित्रपट 'अशी ही बनवाबनवी' मधील ह्रदयी वसंत फुलतांनाचे गाणे लावण्यात आले आहे.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने