दिसतं तसं नसतं... तेजस्विनी पंडितला झालयं तरी काय?

मुंबई:  मराठी मनोरंजन विश्वातील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आणि त्याचबरोबर निर्माती म्हणून तेजस्विनी पंडीत ओळखली जाते.तिने तिच्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. आपल्या दर्जेदार अभिनयाने तिने यशाची उंची गाठली आहे.एक सोज्वळ भूमिकेचं पात्र असो किंवा 'रानबाजार' सारख्या सिरिजमधील तिचा बोल्ड अवतार. तिने सागळ्याच भूमिका चोख निभावल्या आहेत. ती सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते.
नवीन वर्षाच्या तिने चाहत्यांना वेगळ्याचं पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. तिने शेअर केलेल्या एका पोस्टनं पुन्हा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.कलाकारांना त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असावे लागते. चाहतेही आपल्या आवडत्या कलाकारांच्या वैयक्तिक आयूष्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. त्याचे फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते खूश होतात आणि त्या पोस्टवर लाइक्स अन् कमेंटचा वर्षाव करतात.

मात्र यावरच तेजस्विनीने एक खास पोस्ट केली आहे. तेजस्विनीने पोस्ट करत लिहिलं, 'इथे कुणीही तितकं यशस्वी नाहीये जेवढं तो व्यक्ती किंवा इन्स्टाग्राम आपल्याला दाखवतो आणि कुणीही दिसायला तितकं सुंदरही नाहीये जेवढं हे फिल्टर त्यांना दाखवतं. तुमचा आज हा कालपेक्षा जास्त चांगला कसा आहे याची तुम्हीच केलेली तुलना तुमच्यासाठी जास्त चांगली आणि फायदेशीर ठरते.'तेजस्विनीच्या या पोस्टनं सगळ्याचं लक्ष तिच्याकडे वळालं आहे. एकंदरित तेजस्वीनीला म्हणायचं की सोशल मिडियावरचं जग हे आभासी आहे. त्यावर विश्वास ठेवणं चुकिचं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने