टीना दत्ताचा पत्ता कट तर कोणाला मिळणार 'टिकिट टू फिनाले'!

मुंबई: टीव्हीवरील वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस 16 मध्ये सध्या बरेच ट्विस्ट पाहायला मिळत आहेत . गेल्या आठवड्यात या शोमध्ये १२ स्पर्धक होते, पण या वीकेंड का वार मध्ये घरातुन तीन स्पर्धकांना बाहेर काढण्यात आले. श्रीजीता डे,साजिद खान-अब्दू रोजिक यांना घरातुन बाहेर काढल्यानंतर घरातलं वातावरणं आता वेगळंच झालं आहे.आता घरातुन बाहेर जाण्यासाठी टीना दत्ता नंबर लागणार असल्याचं बोललं जातं आहे. या आठवड्याच्या नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील सदस्य आता टीना दत्ताला टार्गेट करणार आहे. ज्यामुळे टीना दत्ता नॉमिनेशन टास्कमध्ये फसणार आहे.बिग बॉस 16 च्या आगामी भागाचा प्रोमो समोर आला आहे. या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना नॉमिनेशनचा टास्क पाहायला मिळणार आहे. प्रोमोमध्ये असे दिसून येते की बिग बॉसच्या निर्मात्यांनी घरातील सदस्यांसाठी नामांकनांची एक दलदल तयार केली आहे आणि स्पर्धक त्यात एकमेकांना फेकणार आहेत.प्रोमोमध्ये असे दिसून येते की मंडळातील प्रत्येक सदस्य टीना दत्ताचे नाव घेतो. निमृत, सुंबुल, सौंदर्या हे सर्व टीनाला नॉमिनेट करतात आणि म्हणतात की तिचा खेळातील सहभाग इतरांपेक्षा कमी आहे. दुसरीकडे, टीनाने सौंदर्याला नॉमिनेट केले. या प्रोमोवरून स्पष्ट झाले आहे की, टीनानंतर सौंदर्या आता घरातल्या सदस्यांच्या निशाण्यावर आहे.प्रोमोमध्ये असे दाखवले जात आहे की बिग बॉस म्हणतात की जो सदस्य घराचा कॅप्टन होईल त्याला फिनालेचे तिकीट मिळेल. सगळ्यात आधी निमृतला कॅप्टन बनवण्यात आलंय, पण निमृतने कर्णधारपद कायम ठेवलं तरच तिला फिनालेचं तिकीट मिळेल, असंही म्हटलं आहे. आता घरातील सदस्यांना तिची कॅप्टनसी हिसकावण्यासाठी सांगतात..आणि त्यानंतर घरातील सदस्य हे वेगवेगळ्या प्लॅनिंग करतांना दिसतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने