साध्वी प्राची यांना 'पठाण' ची अ‍ॅडव्हान्स बुकिंग पचेना! ट्विट करत म्हणाल्या, 'शाहरुख तू'

मुंबई: शाहरुखचा 'पठाण' हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला बंपर ओपनिंग मिळणार आहे. शुक्रवारपासून देशभरात या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून तिकीट विक्रीचा वेग पाहता हा चित्रपट इतिहास रचणार असल्याचे दिसते. एकीकडे चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंगही जोरात सुरू आहे.मात्र तरीही चित्रपटाला होणारा विरोध थांबण्याचे नाव घेत नाहीये. विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची या चित्रपटाबाबत सातत्याने वक्तव्य करीत आहेत. अलीकडेच त्यानी ट्विटरवर 'पठाण'च्या आगाऊ बुकिंगचा उल्लेख करत पुन्हा शाहरुख खानची खिल्ली उडवली आहे.साध्वी प्राची यांनी लिहिले आहे की, “जर पठाणला इतके बंपर अॅडव्हान्स बुकिंग मिळत असेल तर पीव्हीआर स्टॉक का घसरले? शाहरुख खान, तू कितीही पैसे गुंतवलेस तरी आता पब्लिकला पप्पू बनवू शकत नाही". त्याच्या या ट्विटवर अनेकांनी साध्वी यांना पाठिंबा दिला आहे. त्याचवेळी काहींनी त्याच्यावर ताशेरेही ओढलेही आहे.एका युजरने लिहिले, "प्राची पप्पू तुम हो और पब्लिक को बना रही हो. शाहरुख खानच्या खर्चावर पीव्हीआर चालत नाही." तर दुसऱ्याने लिहिले, "चित्रपट बनवणाऱ्यापेक्षा तर तुम्हीच पठाणचे प्रमोशन जास्त करत आहात. चालू ठेवा तुम्ही चांगलं करत आहात." तर एकानं लिहिलयं, "अहो दीदी विनेश फोगट आपल्या हक्कांसाठी जंतरमंतरवर बसल्या आहेत. जर तुम्ही पठाणवर बहिष्कार टाकून झाला असेल तर त्या महिलांसाठीही 2 ट्विट करा."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने