जेव्हा युद्ध काळात RRR च्या टीमनं पाठवले होते युक्रेनियन कलाकारांना पैसे..

मुंबई: सध्या मनोरंजन विश्वात एकच चर्चा आहे ती एसएस राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' या चित्रपटाची.. या चित्रपटाने पुन्हा इतिहास रचला आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाने केवळ दाक्षिणात्यच नाही तर एकूणच भारतीय मनोरंजन विश्वाची मान उंचावली आहे. अशीच एक अभिमान वाटणारी गोष्ट यानिमित्ताने पाहूया..रशिया आणि युक्रेनच्या युद्धाने अवघ्या जगाला हादरवून सोडलं होतं. कित्येक लोकांचे निरपराध बळी या युद्धाने घेतले. रशियाने युक्रेन मध्ये हाहाकार माजवला होता. यावेळी RRR चित्रपटाच्या कलाकारांनी युक्रेनच्या कलाकारांना आर्थिक मदत पाठवली होती.



त्यामागेही एक खास कारण आहे. ही युद्ध सुरू होण्याच्या काहीच काळ आधी तिने RRR चित्रपटाच्या 'नाटू नाटू' गाण्याचे चित्रीकरण झाले होते. या सर्व प्रक्रियेत दिग्दर्शक राजामौली यांना तिथल्या युक्रेनियन कलाकारांनी मोठी मदत केली. हेच कलाकार बॅक स्टेज, स्टॉपबॉय म्हणूनच कामाला होते. त्यामुळे RRR शी त्या कलाकारांचे वेगळे नाते जुळून आले.याच प्रेमाची जाणीव म्हणून युद्ध काळात त्या कलाकारांना मदत पाठवण्याचा निर्णय RRR च्या कलाकारांनी घेतला. अभिनेता रामचरण यानं आपल्या बॉडीगार्डचे काम करणाऱ्या त्या युक्रेनच्या कलाकारांना आर्थिक साह्य केले होते. तर ज्या युक्रेनियन कलाकारांनी आरआरआरमध्ये काम केले त्यांच्या परिवारालाही मदत करण्यासाठी RRR मधील कलाकार पुढे आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने