अंदमानमधील 21 निनाव बेटांना परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावे

अंदमान-निकोबार: अंदमान-निकोबार येथील जी २१ निनावी बेटे होती त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 परमवीर चक्र विजेत्यांची नावं देण्यात आली आहे.नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी रोजी केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार बेटांवर एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली होती.यावेळी अंदमान निकोबारमधील २१ बेटांना नावं देण्यात आली. या बेटांना अद्याप नावे नव्हती. आतापर्यंत ते फक्त अंदमान निकोबार बेटांच्या नावाने ओळखले जात होते. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी अंदमान आणि निकोबारच्या 21 बेटांना देशातील 21 परमवीर चक्र विजेत्यांची नावं दिली आहेत.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने