"शाहरुख मला तुझी दुसरी बायको बनव", उर्फीची 'पठाण'वर नजर

मुंबई: सध्या सर्वत्र शाहरुखच्या पठाणची चर्चा सुरु आहे. शाहरुखच्या चाहत्यांमध्ये पठाणची क्रेझ किती आहे हे तर चित्रपटाची कमाईच सांगत आहे. अनेक कलाकारांनी पठाण चित्रपटावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.आपल्या फॅशन आणि वादामुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फीलाही शाहरुखची भुरळ पडली आहे. नुकतच तिला पापाराझींनी स्पॉट केलं. यावेळी तिला शाहरुखच्या पठाणबद्दल विचारल त्यावेळी तिनेही अशी काही प्रतिक्रीया दिली की ते ऐकून सर्वच हसू लागले.उर्फीने म्हणाली की, तिला शाहरुख खानसोबत लग्न करायचं आहे. पापाराझीने तिला पठाणवर बॉयकॉट करण्याबद्दलही विचारलं त्याच बरोबर पठाणच्या यशावर उर्फी जावेद म्हणाली की, शाहरुख मला तुझी दुसरी बायको बनव.पापाराझीने उर्फीला पठाणला बॉयकॉट बद्दल विचारल्यावर ती म्हणाली की, 'तुम्ही लोकं हवे तर माझ्यावर बहिष्कार टाका पण कृपया शाहरुख खानला बघा.'यानंतर पापाजींनी पुन्हा विचारले की शाहरुखसाठी तुम्हाला काही मॅसेज द्यायचा आहे. उर्फी म्हणाली त्याचा काही फायदा होणार नाही. त्याला ते दिसणारचं नाही. त्यावर पापाराझी म्हणाले, नाही, ते सगळं पाहतात. यावर उर्फीने शाहरुखला आय लव्ह यू असं म्हणत 'मला तुझी दुसरी बायको बनव.' आता उर्फीचा हो व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहे.उर्फी जावेद कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असते आणि त्यामूळे ट्रोलच्या निशाण्यावर येते. आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिमपर्यंत बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिले आहे. आता उर्फी जावेदने पुन्हा एकदा बोल्डनेसची हद्द पार केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने