उर्मिला मातोंडकर अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये; भारत जोडो यात्रेत सहभागी

मुंबई  : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर जम्मू येथे भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या आहेते. त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. पुन्हा उर्मिला मातोंडकर कॉंग्रेसच्या वाटेवर? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. बऱ्याच कालावधीनंतर उर्मिला मातोंडकरउर्मिला मातोंडकर आज राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या आहेत. 

यात्रेत सामील होण्यापूर्वी उर्मिला मातोंडकरने एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्यांनी या यात्रेला राजकारणापेक्षा सामाजिक महत्त्व आहे. अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये दिसल्या आहेत. उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमधून राजकारणात प्रवेश केला होता. काँग्रेसच्या तिकीटवर त्यांनी मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवली होती. आता त्या शिवसेनेमध्ये आहेत.सामाजिक मूल्यांवर आधारित या कारवाँमध्ये ती सामील होत आहे. या प्रवासात खूप प्रेम, आपुलकी, श्रद्धा आणि भारतीयत्व आहे आणि हा भारतीयत्वाची मशाल प्रत्येकाच्या मनात असाच तेवत राहावा. असही यावेळी उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.



कॉंग्रेस पक्षाला राम राम

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांना भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने