ना अपूर्वा..ना किरण माने..आयत्या वेळेला गेम पलटणार..काय म्हणाला उत्कर्ष शिंदे?

मुंबई: बघता बघता बिग बॉस ४ चं पर्व आता हळूहळू शेवटाकडे प्रवास करत आहे. आता घरात आहेत टॉप ५.अमृता धोंगडे,किरण माने,अक्षय केळकर,अपूर्वा नेमळेकर आणि राखी सावंत. उद्या रविवारी पार पडतोय या सिझनचा फिनाले.गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची वाट सगळे पाहत होते तो दिवस आता येतोय, त्यामुळे अर्थातच घरातील स्पर्धकांच्याच नाही तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या प्रेक्षकांच्या मनातील धाकधूकही वाढलेली आहे.आता अंदाज लावले जातायत कोण असणार टॉप ३, कोण असणार टॉप २ आणि कोण ठरणार विजेता...यादरम्यान बिग बॉस सिझन ३ फेम उत्कर्ष शिंदेन सांगितलं आपलं मत... त्याच्या मते कोण होईल विनर?टॉप 5 ही नावं समोर आल्यावर आता टॉप 3 मध्ये कोण जाणार यासंदर्भात उत्कर्षला विचारले तर त्याने अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे आणि राखी सावंत ही तीन नावं सांगितली. गेल्या आठवड्यात उत्कर्ष शिंदे बिग बॉसच्या घरात जाऊन सदस्यांना भेटला आणि काही टास्क खेळला .आणि या टॉप 3 मध्ये राखी सावंत विनर व्हावी असं त्याचं मत आहे.राखी सावंत का विनर व्हावी? यासंदर्भात त्याला विचारले असता त्याने स्पष्ट सांगितलं " बिग बॉसच्या घरात जेव्हा आपण एक सदस्य म्हणून जातो तेव्हा तिथे खेळ खेळणे महत्वाच आणि प्रेक्षकांच्या नजरेत राहण हे गरजेचं आहे, आणि राखी सावंतने बिग बॉसच्या घरात येताच प्रेक्षकांच्या मनात जागा केली ' अंड्याची भुर्जी आणि राखी सावंतची मर्जी ' या घरात चालणार हे राखीने पहिल्या दिवसापासून दाखवले.''बिग बॉसच्या घरात राखीने आतपर्यंत काही ना काही करून प्रेक्षकांच मनोरंजन केले आहे.मग ते पाणी फेक असो , अंडी फोडणे असो पीठ फेकणे असो किंवा चेहऱ्यावर रंग रंगोटी करून मॉनजोलिका बनणे असो.. हे सगळं करून तिनं बिग बॉसच सुस्तावलेलं घर जाग केलं आहे''.

जेव्हापासून राखी सावंत बिग बॉसच्या घरात आली आहे ति आपले अनुभव सगळ्यांना सांगताना दिसते, इतकेच नव्हे तर सगळ्यांना जाग पण करते... ती अनेक वेळा बोलली आहे, 'मी तुम्हाला जाग करायला आली आहे'.बिग बॉसच्या घरात गेम फक्त टाक्सवेळी खेळायचे नसतात तर २४ तास कसं आपण प्रेक्षकांचे मनोरंजन करू हे पण महत्वाचं आहे. हे बिग बॉसचं घर आहे जितका तमाशा तितकीच पब्लिक खुश.शेवटी प्रेक्षकांना कोणता मनोरंजनाचा मसाला पाहिजे हे राखीला माहिती आहे भले राखी सावंत वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आली आहे पण जर ती विनर झाली तर बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री करणाऱ्या सदस्यांची एक वेगळीच छाप पडेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने