रितेश-जेनिलिया मालामाल.. 'वेड'नं १३ दिवसात कमावले..

मुंबई : सध्या मनोरंजन विश्वात चर्चा सुरु आहे ती म्हणजे रितेश देशमुखच्या वेड या चित्रपटाची. मराठी मनोरंजन विश्वात या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या 'वेड' या सिनेमाने जवळपास सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. सलग 13 दिवस या चित्रपटाने तूफान कमाई केली आहे.वेड' हा मराठीतील दमदार कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. रितेश आणि जेनिलिया यांची ऑफ स्क्रीन केमिस्ट्री ऑन स्क्रीन ही पाहण्यासाठी चाहते आतुर होते. दोघांचाही फॅनक्लब जबरदस्त मोठा आहे. जेनेलिया चा हा पहिलाच मराठी सिनेमा असल्याने प्रेक्षक अधिकच उत्सुक होते. अखेर ही केमिस्ट्री वर्क झाली असून 'वेड' चित्रपटाने प्रेक्षकांना 'वेड' लावलं आहे असं म्हणायला हरकत नाही.या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात चांगली कमाई केलीच. पण सलग 13 दिवस हा चित्रपट जोरदार कमाई करत आहे. दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांना सिनेगृहांत खेचून आणण्यात 'वेड' यशस्वी झाला आहे. कारण लवकरच हा चित्रपट 50 कोटी कमाईच्या घरात पोहोचणार आहे. सध्या या चित्रपटाने ४० कोटी दहा लाख इतकी केली आहे. त्यामुळे हा आठवडा 50 कोटी पार करणारा असेल, असा अंदाज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने