एप्रिलपासून 'ही' जुनी वाहने करणार स्क्रॅप, हे वाचाच

मुंबई: वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी सरकार सातत्याने काही ना काही पावले उचलत असतात. अशातच सरकारने 1 एप्रिलपासून जुन्या वाहनांना हद्दपार करण्याचा निर्णय घेतलाय. हि जुनी वाहने 15 वर्षाहून जुनी असेल.या अंतर्गत 15 वर्षांहून अधिक जुन्या वाहनांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे तर ही वाहने नोंदणीकृत भंगार केंद्रावर नष्ट केल्या जातील पण वाहने नेमकी कोणती हे पण सविस्तर जाणून घेऊया. 



'या' वाहनांचा समावेश

या नवीन नियमानुसार केंद्र सरकार, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारची वाहने, सोबतच महामंडळांची, सार्वजनिक उपक्रम, सरकारी अनुदानित संस्था आणि राज्य परिवहनाची वाहने जी 15 वर्षांपेक्षा जुनी आहेत त्या स्क्रॅप केले जाणार आहे. हा नवीन नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या वर्षीच याविषयी सांगितले होते. 15 वर्षांहून अधिक जुनी सरकारी वाहने भंगारात टाकण्याची ते तयारी करत आहोत. हा नियम लागू झाल्यानंतर रस्त्यांवरून बरीच सरकारी जुनी वाहनं नाहीशी होणार असून या पासून होणारे पोल्यूशन दूर होण्यासही मदत होणार.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने