विकास सावंतला लागलेयत ऑलिम्पिकचे वेध..'या' खेळात दाखवायचं आहे कौशल्य

मुंबई: बिग बॉस मराठी ४ च्या पर्वात विकास सावंतनं मूर्ती लहान,किर्ती महान प्रमाणे आपला परफॉर्मन्स दाखवत घरातील सदस्यांनाच नाही तर शो पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही हैराण करुन सोडलं होतं.शो सुरु झाला तेव्हा विकास फारशी चमक दाखवू शकला नाही पण नंतर-नंतर मात्र त्यानं घरात आपला दबदबा निर्माण केला होता. किरण मानेंसोबतच्या त्याच्या मैत्रीनं अन् अपुर्वा सोबतच्या त्याच्या भांडणानं शो मध्ये भलताच रंग भरला होता.बिग बॉसच्या घरातनं विकासनं एक्झिट भले लवकर घेतली होती तरी आजही शो संपल्यानंतर विकास सावंत ही त्याची ओळख प्रेक्षकांच्या डोक्यात फिट आहे.सध्या बातमी कानावर पडतेय की विकास सावंतने ऑलिम्पिकची तयारी सुरु केली आहे. विकासला थाळी फेक खेळामध्ये आपलं प्राविण्य दाखवायचं आहे. त्यामुळे त्या खेळात सहभागी होण्याच्या दिशेने त्याची आता तयारी सुरु झाली आहे.


विकास सावंत सोशल मीडियावर भलताच सक्रिय पहायला मिळतो. तो आपले व्हिडीओ देखील शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वीच विकासने समुद्र किनारी थाळी फेक करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या माध्यमातूनच त्यानं आपण ऑलिम्पिकची तयारी करत असल्याचं सांगितलं होतं.विकासनं एका इंग्रजी वेबसाईटशी बातचीत दरम्यान आपली ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची इच्छा बोलून दाखवली होती.तो म्हणाला, माझी उंची कमी आहे. मी ठेंगणा आहे. पण असं असलं तरी मला ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची इच्छा आहे. माझं ध्येय आता ऑलम्पिक आहे. माझी ताकद आणि क्षमता बिग बॉस मराठीच्या घरात प्रेक्षकांनी पाहिलीच आहे. त्यामुळे आता ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करुन मला संपूर्ण जगाला माझ्यातील ताकदीचं प्रदर्शन करायचं आहे.आता याच मुलाखतीत विकासनं ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासोबतच दिग्दर्शक होण्याची इच्छा देखील बोलून दाखवली. ठेंगण्या लोकांच्या लव्हस्टोरी लोकांनी पाहिल्या नाही. मला ती हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांना दाखवायची आहे..असं देखील विकास म्हणाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने