बघा कुठं जुळतंय का? कोट्यावधीची मालकीन असलेल्या तीला लग्नासाठी मुलगा मिळेना!

पाकिस्तान: मोठ्या घरची, श्रीमंत मुलीशी लग्न करायला कोणीही तयार होईल. अर्थात अनेक हिंदी मराठी चित्रपटातही हिरोला श्रीमंत बापाचीच मुलगी पटते, असे दाखवले जाते. असे चित्र असताना एका गडगंज मुलीला लग्नासाठी मुलगाच मिळत नाहीये.चांगल्या जोडीदारामध्ये प्रेमाचे गुण असावेत असे म्हणतात.कारण, प्रेमाची तूलना कशासोबतही केली जाऊ शकत नाही. त्यामूळेच लोक पैशाला नाही तर प्रेमाला महत्त्व देतात. तरीही एका श्रीमंत मुलीशी लग्न करायला कोणी तयार होत नाहीय. याबद्दलचा एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूणी आपली व्यथा सांगत आहे. सुंदर आणि श्रीमंत असूनही त्याला जीवनसाथी मिळत नसल्याचे दु:ख आहे. एवढे सगळे करूनही चांगला जीवनसाथी न मिळाल्याने ही तरूणी नाराज आहे.ही पाकिस्तानचा एका युट्यूब चॅनलवर या तरूणीची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. या महिलेचे नाव नैना राजपूत आहे. तिने स्वत:ची कंपनी उभी करून आतापर्यंत सुमारे 10 कोटी रुपये कमावले आहेत. तिच्याकडे सर्व सुखसोयी आहेत. इतकं सगळं असूनही तिला जीवनसाथी मिळत नाही. जर तिला चांगला जीवनसाथी मिळाला तर ती आपले जीवन आनंदाने जगू शकेल. या महिलेचे आधी एक लग्न झाले होते. पण, कमी वेळातच तिच्या पतीचे निधन झाले आहे. पतीच्या मृत्यूनंतर खचून गेलेल्या नैना यांनी मेहनतीने कंपनी उभी केली. त्यासध्या दहा कोटीच्या मालक आहेत.

पैसा आहे पण सोबत कोणी नाही. त्यामूळे नैना यांनी जीवनसाथी शोधण्यास सुरूवात केली आहे. पण, त्यांच्या पदरात निराशाच पडत आहे.माझ्या काही मित्रांनी सल्ला दिला की, आयुष्याच पुढे जात रहा. त्यासाठी एकटे न राहता तिने काही काम करावे, ज्यामुळे तिला धीर मिळेल आणि तिचे आयुष्य पुन्हा जगू शकेल. नयनाने आपल्या मैत्रिणींच्या आज्ञेत राहून स्वतःचे काम सुरू केले. या दरम्यान तिला लोकांचे टोमणेही ऐकावे लागले. पण ती सर्व सहन करत पुढे जात राहिली.आज ती करोडोंच्या कंपनीची मालकिन आहे. नैना यांनी मुलाखतीत सांगितले की, तिने अवघ्या 3-4 वर्षात ही कोट्यवधींची मालमत्ता केली आहे. आता त्यांच्याकडे फक्त आयुष्याच्या जोडीदाराची उणीव आहे. जो त्यांची काळजी घेईल, त्यांना प्रेम देईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने