फेब्रुवारीत करा मनोरंजनवारी! 7 हिंदी वेब सीरिजची ट्रीट..

मुंबई: ओटीटी प्लॅटफॉर्मने 2022 मध्ये बॅक टू बॅक हिट रिलीज दिले आहेत.मात्र आता २०२३ ही सज्ज झालं आहे. जानेवारीनंतर आता फेब्रुवारीही पूर्ण मसाला मनोरंजन देण्यासाठी तयार आहे. कारण अनेक प्रॉडक्शन हाऊस प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी वेब सिरिजची मेजवाणी घेवुन आले आहे.

1-क्लास

वेब सिरीज एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तीन मुलांना दिल्लीतील पॉश इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश मिळाल्यावर काय होते? याच विषयावर ही वेब सिरीज आहे. ही वेब सिरीज ३ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

2. जहानाबाद

यामध्ये परमब्रत चट्टोपाध्याय, रजत कपूर, ऋत्विक भौमिक आदी मुख्य भूमिकेत आहेत. 2005 मध्ये जेहानाबादमधील जेलब्रेकच्या वास्तविक घटनांवर आधारित आहे. ही सिरिज ३ फेब्रुवारीला सोनी लाईव्हवर प्रदर्शित होणार आहे.

3. रोक्तोकोरोबी

या मालिकेची कथा सात्यकी या मानसशास्त्रज्ञाभोवती फिरते, जो जोनई येथे आपल्या मावशीच्या घरी जातो आणि घरातील अनेक रहस्ये शोधतो. ही सिरिज 03 फेब्रुवारी रोजी Zee5 वर प्रदर्शित होणार आहे.4. दहाड

याद्वारे सोनाक्षी सिन्हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. यामध्ये ती पोलीस अधिकारी अंजलीची भूमिका साकारणार आहे. ही मालिका ७ फेब्रुवारीला Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे

5. फर्जी

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आता ओटीटी वर फर्जीच्या माध्यमातुन एंट्री करणार आहे. यात तो एका मध्यमवर्गीय मुलाची कथा दाखवण्यात आली आहे, तो बनावट नोटा छापण्यास सुरुवात करतो. ही वेब सिरीज 10 फेब्रुवारीला Amazon Prime Video वर रिलीज होणार आहे.

6. द नाइट मॅनेजर

आदित्य रॉय कपूर आणि अनिल कपूर यांची ही वेब सीरीज ‘द नाइट मैनेजर’ ची सध्या चर्चा सुरु आहे. ही वेब सिरिज 17 फेब्रुवारीला डिज्नी प्लस हॉटस्टार रिलिज होईल. यात शोभिता धुलिपाला देखील मुख्य भुमिकेत दिसणार आहे.

7. माइनस वन- न्यू चॅप्टर

मायनस वन - न्यू चैप्टर ही सिरिज ओटीटी प्लॅटफॉर्म लायन्स गेम प्लेवर व्हॅलेंटाईन डे म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. या मालिकेत अभिनेता आयुष मेहरा आणि आयशा अहमद हे वरुण आणि रियाची प्रेमकहाणी साकारताना दिसणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने