त्या तरुणीनं २९ सेकंदातच विश्वविक्रमाला घातली गवसणी, बुद्धीच्या खेळात रचला मोठा डाव, पाहा

मुंबई: बुद्धीबळ खेळणं सर्वांसाठी सोपं नसतं. यासाठी स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग, स्किल, खेळाचे नियम आणि ध्येय गाठण्यासाठी चांगल्या अभ्यासाची गरज असते. भारतातील एका तरुणीने बुद्धीबळ न खेळताच एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लाखो लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. बद्धीबळातील दिग्गज खेळाडू म्हणून विश्वनाथन आनंद यांनी ठसा उमटवला आहे. पण आतापासून तुम्हाला आणखी एक नाव लक्षात ठेवावं लागणार आहे. कारण पॉंडेचेरीच्या एस. ओडेलिया जॅस्मीन या तरुणीने बुद्धीचा कस लावून थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच केला आहे. जॅस्मीनने अवघ्या २९.८५ सेकंदात बुद्धीबळाचा सेट बोर्डावर व्यवस्थित लावला. या चमकदार कामगिरीमुळं जॅस्मीनला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचा किताब मिळाला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या इन्स्टाग्रामपेजवर या तरुणीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने दिलेल्या माहितीनुसार, बुद्धीबळाचा हा विक्रम मोडण्यासाठी या तरुणीनं वर्षभर अभ्यास केला होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर या व्हिडीओला शेअर करण्यात आलं आहे. व्हिडीओला शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘अतिशय वेगानं व्यवस्थित लावण्यात आलेला बुद्धीबळाचा सेट : एस. ओडेलिया जॅस्मीनकडून २९.८५ सेकंद’एस.ओडेलिया जॅस्मीनने बुद्धीबळाचे पॅदे सर्वात वेगानं बोर्डावर सेट करून विश्वविक्रम केला. जॅस्मीन सर्वात वेगानं बुद्धीबळाचा सेट लावताना या व्हिडीओत दिसत आहे. जास्मीनचा हा जबरदस्त टॅलेंट व्हिडीओत पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ६० हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर या तरुणीवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

रेकॉर्ड लिस्टमध्ये या नावांचाही उल्लेख करण्यात आलाय

१) २०२१ – डेविड रश (युएसए), ३०.३१ सेकंद
२) २०१९ – नकुल रामास्वामी (युएसए), ३१.५५ सेकंद
३) २०१५ – अल्वा वेई (युएसए), ३२.४२ सेकंद
४) २०१४ – डालीबोर जाब्लानोविक (सर्बिया) ३४.२० सेकंद

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने