'सगळ्या डिग्र्या...सगळं शिक्षण पाण्यात...', कोणावर वैतागला प्रसाद ओक?

मुंबई : प्रसाद ओक सोशल मीडियावर भलताच सक्रिय पहायला मिळतो. तो नेहमीच वेगवेगळे रील्स,व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो आणि धमालही आणतो. अर्थात यामध्ये त्याची पत्नी देखील अनेकदा त्याला साथ देताना दिसते.सध्या सोशल मीडियावर त्यानं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 'तर सगळ्या डिग्र्या...सगळं शिक्षण पाण्यात....' असं नेमकं का म्हणाला प्रसाद ओक..चला जाणून घेऊया.प्रसाद ओकनं सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो म्हणताना दिसत आहे,''तुम्ही किती डिग्र्या घ्या,शिक्षण घ्या, स्कॉलरशीप मिळवा, दहावी-बारावी बोर्डात या ..पण ते एक वाक्य जेव्हा कानावर पडतं तेव्हा सगळं शिक्षण पाण्यात...आता ते एक वाक्य म्हणजे जेव्हा तुमची बायको तुम्हाला म्हणते,तुला ना यातलं काही कळत नाही...''आता हा व्हिडीओ पोस्ट करत प्रसादनं एकप्रकारे बायका आपल्या नवऱ्यांना कसं कमी लेखतात,नवरे किती बिचारे हे दाखवण्याचा प्रय़त्न केला आहे. पण खरी मजा तर पुढेच आली आहे. जेव्हा प्रसादच्या या व्हिडीओ पोस्टवर त्याच्या नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. काहींनी प्रसादने व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या भावानांचे समर्थन केले आहे तर काहींनी त्यालाच उलट सुनावले आहे. प्रसादची ती व्हिडीओ पोस्ट बातमीत जोडलेली आहे.प्रसाद ओक काही दिवसांपूर्वी जोरदार चर्चेत आला होता ते 'धर्मवीर' या गाजेलल्या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाल्यामुळे. आता चाहत्यांना दुसऱ्या भागात काय पहायला मिळतंय याची उत्सुकता लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने