शालिनने शोमध्ये येण्याआधीच डर्टी गेमची केली प्लॅनिंग, टीना दत्ताचा आरोप

मुंबई: टीव्हीचा वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस 16 ला पहिला फायनलिस्ट मिळाला आहे. शोमधील एका टास्कसोबतच, निमृत कौर अहलुवालियाने फिनालेचे तिकीट जिंकले आहे. मात्र, तिकीट टू फिनालेची घोषणा होताच घरातील वातावरण पूर्णपणे बदलले आहे.शोमध्ये कोण मित्र आणि कोण शत्रू. आता प्रेक्षकांनाही कळत नाही. तिकीट टू फिनाले टास्कमध्ये शालीन भानोत आणि टीना दत्ता यांच्यात जोरदार भांडण झाले होते, टीना दत्ताने शालीन शोमध्ये येण्याआधीच डर्टी गेमची प्लानिंग करत होता, असा आरोप केलाय.पहिल्या फायनलिस्टची घोषणा झाल्यानंतर, टीना दत्ता आणि प्रियांका चहर चौधरी त्यांच्या खोलीत बसलेल्या दिसल्या. यादरम्यान दोघेही शालीनबद्दल बोलत होते, ज्यामध्ये टीनाने अशा काही गोष्टी सांगितल्या, हे ऐकून प्रियांकाला धक्काच बसला. टीना दत्ताने दावा केला की शालीन भानोतच्या पीआर टीमने शो सुरू होण्यापूर्वी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मग त्या लोकांना मला भेटायचे होते जेणेकरून आम्ही खेळाचे सर्व नियोजन करूनच शोमध्ये येऊ.

आपण एकत्र एक खेळ खेळावा अशी शालीनची इच्छा होती आणि त्यात गौतम विग-साजिद खानचेही नाव येत होते. त्यामुळे शोमध्ये येताच शालीन आणि गौतम अचानक भाऊ झाले. आणि आता शालिनने घरात येताच वेगळं रूप दाखवल.याच्या पुढे टीना दत्ताही काहीतरी बोलताना दिसली, जे ऐकून प्रेक्षकही थक्क झाले. टीनाने प्रियांकाला पुढे सांगितले की, शालीनने तिला बिग बॉसच्या घरात काही अत्यंत वाईट गोष्टी विचारल्या होत्या. ती कॅमेऱ्यात सांगू शकत नाही असे काहीतरी. टीनाचे हे शब्द ऐकून प्रियांकाला धक्काच बसला.आता काय खरं, काय खोटं याचा उलगडा जेव्हा हे सर्व घराबाहेर येतील तेव्हा होईलच. शालिनने असं जर केलं असेल तर शोच्या पुढच्या वाटचालीवर त्याचा परिणाम नक्कीच होईल. याशिवाय विकेंड का वार मध्ये सलमान खान सुद्धा शालीनला झापेल यात शंका नाही

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने