पठाण जोमात बॉयकॉट गँग कोमात! शाहरुखच्या एन्ट्रीन थिएटर झिंगाट..

मुंबई:  बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचे चाहते ज्या क्षणाचे वाट पहात होते. तो आज आला आहे. ' पठाण' चित्रपटाद्वारे 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतत आहे . त्याच्या कमबॅक चित्रपटाची क्रेझ त्याच्या चाहत्यांमध्ये दिसून येत असून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली आहे.'पठाण' या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'ब्रह्मास्त्र'चा विक्रम तर मोडलाच पण 'KGF 2'ला टक्कर दिली. या चित्रपटाबाबत ट्विटरवर लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत. पहिल्या दिवशीचा पहिला शो पाहण्यासाठी सकाळपासूनच चित्रपटगृहांबाहेर गर्दी उसळली आहे. शाहरुख खान आणि त्याच्या 'पठाण' चित्रपटासाठी चाहते ट्विटरवर प्रतिक्रिया देत आहे.तरण आदर्शने ट्विटरवर सांगितले आहे की, शाहरुखचा चित्रपट देशभरातील 5200 स्क्रीन्सवर प्रदर्शित होत आहे, जो हिंदी तमिळ आणि तेलगू या तिन्ही भाषांमध्ये आहे. तो जगभरातील 2500 स्क्रीनवर येत आहे. म्हणजेच जगभरात हा चित्रपट 7700 स्क्रीन्सवर प्रदर्शित होत आहे.चित्रपट पाहणाऱ्या चाहत्यांनी ट्विटरवरही पोस्ट टाकायला सुरवात केली आहे. 'पठाण मध्यांतरापर्यंत एक सरप्राईज आहे, वेगवान, हाय व्होल्टेज अॅक्शन. शाहरुख खानच्या इंट्रो सीनने थिएटरला स्टेडियम बनवले आहे.'

चित्रपटाच्या पहिल्या शोबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे, त्याची झलकही लोकांनी ट्विटरवर शेअर केली आहे. मुंबईत सकाळी ७ वाजताच्या 'पठाण' शोची अवस्था पाहून बॉयकॉट गँग कोमात गेल्याचा व्हिडिओ एका चाहत्याने शेअर केला आहे.कहर म्हणजे तर काही चाहते मॉर्निंग शो पाहण्यासाठी थिएटरबाहेरच झोपले होते, हे दृश्यही सोशल मीडियावर दाखवण्यात आले आहे.या चित्रपटात किंग खान अॅक्शन अवतारात दिसत असल्याने चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक होतेच, त्याचबरोबर दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने