अथिया नटली, मांडव सजला... न्यूझीलंड मालिकेवेळीच राहुलच्या लग्नाचा मुहूर्त ठरला

मुंबई: लोकेश राहुल याच महिन्यात अथिया शेट्टीसोबत लग्न करणार आहे. त्यांच्या लग्नाची तारीख देखील समोर आली आहे, जेव्हा क्रिकेटर राहुल आणि अथिया लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.राहुल सध्या श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे, ज्याचा शेवटचा सामना १५ जानेवारीला होणार आहे. यानंतर राहुल न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेऊ शकतो. कारण राहुललाही लग्नासंदर्भात अनेक गोष्टी फायनल करायच्या आहेत.अथिया शेट्टीला तिच्या भावासोबत फॅशन डिझायनरच्या घरी देखील स्पॉट करण्यात आले होते, ज्यानंतर अथियाने तिच्या लग्नाचा ड्रेस फायनल केल्याची चर्चा आहे. लग्न कोणत्या दिवशी होणार त्याची माहिती समोर आली आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल आणि अथिया शेट्टी 23 जानेवारीला लग्न करणार आहेत, परंतु हा सोहळा 21 जानेवारीपासूनच सुरू होईल. लग्नापूर्वी 21 आणि 22 जानेवारीला हळदी, मेहंदी, संगीत समारंभ आदी कार्यक्रम होतील. लग्न कन्नड रितीरिवाजांनी होणार आहे. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा बंगल्यावर हे लग्न होणार आहे.

जवळच्या नातेवाईकांसह काही मोठी नावेही लग्नाला उपस्थित राहणार आहेत. राहुल हा क्रिकेटपटू आहे, तर अथिया बॉलीवूडची आहे, त्यामुळे क्रिकेट आणि बॉलिवूड जगतातील मोठी नावे लग्नाला उपस्थित राहणार आहेत. अक्षय कुमार, सलमान खान, गोविंदा, शिल्पा शेट्टी आदी बॉलीवूडमधील मोठ्या नावांचा समावेश असेल. त्यामुळे क्रिकेटविश्वातील सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, विराट कोहली यांसारख्या दिग्गजांचा पाहुण्यांच्या यादीत समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने