बॅटवर धोनीची सही, अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना!

मुंबई: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा त्याच्या दिलखुलासपणासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. गेल्या काही वर्षांपासून धोनी हा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. आता धोनी टॉलीवूड अभिनेत्याला दिलेल्या अनोख्या गिफ्टमुळे चर्चेत आला आहे. त्या अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेयर करुन यासंबंधी माहिती दिली आहे.धोनी हा त्याच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाही. मग तो सामान्य चाहता असो किंवा एखादा फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रेटी. धोनी सगळ्यांनाच सारख्याच पद्धतीनं वागणूक देतो म्हणून त्याच्याकडे आदरानं पाहिले जाते. आता त्याच्या एका प्रसिद्ध अभिनेता चाहत्यांन केलेली पोस्ट धोनीविषयी खूप काही सांगून जाणारी आहे. चेन्नई सुपर किंग्जचे कॅप्टननं तमिळ कलावंत योगी बाबांना दिलेलं गिफ्ट चाहत्यांना भलतंच आवडलं आहे.धोनीनं योगींना दिलेलं गिफ्ट हे त्यांना आवडले आहे. त्यांना झालेला आनंद हा गगनात मावणारा नाही. धोनीनं एका बॅटवर त्याची स्वाक्षरी दिली आहे.त्यामुळे योगी कमालीचे आनंदीत झाले आहे. त्यांनी ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. योगी बाबूनं त्या बॅटसोबत एक फोटो शेयर केला असून त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही भलत्याच भन्नाट आहेत.धोनी हा गेल्या काही वर्षांपासून त्याच्या प्रॉडक्शन हाऊससाठी ओळखला गेला आहे. येत्या काळात त्या प्रॉडक्शन हाऊसतर्फे लेट्स गेट मॅरिड नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली गेली आहे. तो चित्रपट २७ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये योगी बाबू, हरिश कल्याण, इवाना आणि नादिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ती एक कॉमेडी फिल्म होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने