आता बाहुबलीची बारी, शाहरुखचा 'पठाण' बनणार नंबर 1 हिंदी चित्रपट, जाणून घ्या 34व्या दिवसाची कमाई

मुंबई: शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमचा 'पठाण' चित्रपट रिलीज होऊन महिना उलटल्यानंतरही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.जवळपास महिनाभरानंतरही हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी होत आहे. मात्र, आता 34व्या दिवशी चित्रपटाची कमाई एक कोटीवर आली आहे.रिपोर्ट्सनुसार, पठाणच्या कमाईत ३४ व्या दिवशी किंचित घट झाली आहे. सोमवारी 75 लाखांचा व्यवसाय केला आहे. कमाई कमी झाली असेल, पण पठाणचा एकूण देशांतर्गत व्यवसाय आता ५२६.४१ कोटींवर पोहोचला आहे.जगभरात या चित्रपटाने एक हजार कोटींचा जादुई आकडा आधीच पार केला आहे. मात्र, हा व्यवसाय ज्या पद्धतीने होत आहे, त्यावरून हा चित्रपट पुढील आठवड्यापर्यंत चित्रपटगृहात राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.पठाणच्या हिंदी व्हर्जनने रविवारपर्यंत 507.60 कोटींचा व्यवसाय केला होता. आता ताज्या आकडेवारीची भर घातली तर त्याची कमाई 508.45 कोटी रुपये झाली आहे.अशा परिस्थितीत, बाहुबली 2 च्या ऑल टाइम हिंदी व्हर्जनचा विक्रम मोडण्यासाठी पठाणला फक्त 3 कोटी रुपयांची गरज आहे. अशा परिस्थितीत या आठवड्याच्या अखेरीस पठाण हा विक्रमही गाठेल अशी अपेक्षा आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा हाय अ‍ॅक्शन पॅक्ड चित्रपट गेल्या महिन्यात २५ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला दमदार ओपनिंगही मिळाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने