शाहिद-करण संगीतमध्ये 'डोला रे डोला'वर धरणार ठेका व्हिडिओ व्हायरल

मुंबई: कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नापूर्वी सूर्यगड पॅलेसमध्ये दोघांचा संगीत सोहळा पार पडणार आहे. आज कियारा आणि सिद्धार्थचा संगीत सोहळा होणार आहे. ज्याची जोरदार तयारी सुरू आहे. आता त्यांच्या संगीताबाबत एक मजेदार गोष्ट समोर आली आहे.रिपोर्ट्सनुसार, करण जोहर आणि शाहिद कपूर सिड-कियाराच्या संगीतमध्ये एका खास गाण्यावर परफॉर्म करणार आहेत. सध्या कॉफी विथ करणच्या 7 व्या सीझनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये करण आणि शाहिद कियाराला वचन देताना दिसत आहेत की ते तिच्या लग्नात देवदासच्या 'डोला रे डोला' गाण्यावर डान्स करतील.कॉफी विथ करण सीझन 7 च्या एका एपिसोडमध्ये, कियारा तिच्या कबीर सिंग सहकलाकार शाहिद कपूरसोबत शोमध्ये दिसली. तेथे, करण, कियाराला तिच्या लग्नात 'देवदास' चित्रपटातील 'डोला रे डोला' या गाण्यावर तो आणि शाहिद माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय सारखे कसे परफॉर्म करतील याबद्दल बोलताना दिसत आहे.हे ऐकून शाहिदने 'हो गया' अशी कमेंट केली आणि तिघेही खूप हसले. विशेष म्हणजे, आता शाहिद आणि करण दोघेही जैसलमेरमध्ये स्पॉट झाले आहेत, कियारा मनीष मल्होत्राने डिझाइन केलेले आऊटफिट घालणार आहे ,कारण प्रसिद्ध फॅशन डिझायनर देखील कियारासोबत जैसलमेरला निघताना दिसला होता.मनीषने हळदी आणि संगीत यांसारख्या इतर समारंभांसाठी वधू आणि वर दोघांसाठीही आऊटफिट डिझाइन केले आहेत. कियाराची मेकअप आर्टिस्ट स्वर्णलेखा गुप्ता तिला तिच्या लग्नासाठी ब्राइडल लूक देणार आहे, तर सेलिब्रिटी मेहंदी कलाकार वीणा नागदा आधीच खास दिवसासाठी जैसलमेरला पोहोचली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने