पृथ्वीराज चौहान आणि राणी संयोगिता यांच्या प्रेमाचा दुवा बनला एक चित्रकार!

मुंबई: सम्राट पृथ्वीराज चौहान आणि त्याची पत्नी संयोगिता यांची प्रेमकथा ही आजही चर्चेत असते. त्या प्रेमकथेत प्रेम तर होतंच पण एक विश्वासाचा धागाही होता. महाराजा पृथ्वीराज आणि राणी संयोगिता हे एका विश्वासावरच प्रेमात पडले. या दोघांमधले अंतर दुर करणारा एक व्यक्ती होता तो म्हणजे एक चित्रकार.व्हॅलेंटाईन विकच्या या मालिकेत आज आपण महान सम्राट पृथ्वीराज चौहान आणि त्यांची सुंदर राणी संयोगिता यांच्या प्रेमकहाणी बद्दल जाणून घेऊयात.दिल्लीच्या तख्तावर बसल्यानंतर तरूण सम्राट पृथ्वीराजाची कीर्ती दूरवर पसरली होती. येथे राजकुमारी संयोगिताच्या रूपाची बरीच चर्चा झाली होती. याच काळात एक चित्रकार या दोघांच्या प्रेमाचा दुवा बनला. तो देशभर फिरायचा आणि पराक्रमी योद्ध्यांची चित्रे काढायचा. तसेच पृथ्वीराज महाराजांचे चित्रही राजकन्येच्या कन्नौज नगरी पोहोचले.


पृथ्वीराज महाराजांचे चित्र पाहुण राणींच्या इतर मैत्रीणी आणि दासी यांच्यातही चर्चा रंगू लागल्या. जेव्हा ही चर्चा राजकुमारी संयोगिता यांच्यापर्यंत हि माहीती पोहोचली. तेव्हा त्यांनाही पृथ्वीराजचा फोटो बघायचा होता. आणि जेव्हा तिने तो फोटो पाहिला तेव्हा पहिल्या नजरेतच पृथ्वीराजवर तिचे मन हरपले. राणी संयोगितांनी मनातल्या मनात त्यांना वरले.जसे महाराजांचे चित्र तिकडे पोहोचले तसेच राणी संयोगिताचे चित्र या चित्रकाराच्या माध्यमातून पृथ्वीराज महाराजांपर्यंत पोहोचले. त्यांचे भानही हरपले. दरम्यान, संयोगिता राणींच्या वडिल जयचंद यांनी संयोगिताचा स्वयंवर आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पृथ्वीराज महाराजांना सोडून सर्व राजपुत्रांना आमंत्रणे पाठवली.

ते एवढ्यावरच थांबले नाहीत. तर, पृथ्वीराजाचा अपमान करण्यासाठी त्याच्यासारखीच मूर्ती बनवून द्वारपालासारखी दारात उभी केली. जेव्हा संयोगिता आपला वर निवडण्यासाठी स्वयंवर येथे आली, तेव्हा पृथ्वीराजांना तेथे न पाहता तिची निराशा झाली. पण तेव्हाच तिची नजर दारात पडलेल्या त्याच्या पुतळ्याकडे गेली.सर्व राजपुत्रांची वर्गवारी करून, संयोगिता पृथ्वीराजांच्या पुतळ्याकडे पुष्पहार घालण्यासाठी गेली. संयोगीताला मूर्तीच्या गळ्यात हार घालायचा होताच. पण, तेवढ्यात पृथ्वीराज महाराज तिथे पोहोचले. आणि मूर्तीऐवजी हारच त्यांच्याच गळ्यात पडला.हे पाहून राजा जयचंद यांना प्रचंड राग आला. संयोगिता राणींवर वार करण्यासाठी ते तलवार घेऊन पुढे गेले. पण त्याआधीच पृथ्वीराज महाराज त्यांना  घेऊन तिथून बाहेर पडले आणि दोघांनी विवाह केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने