राजकीय मैदान गाजवून राज ठाकरेंची OTT वर एन्ट्री, राहुल महाजन सोबत करणार हा शो

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे त्यांच्या बोलण्याच्या खास शैलीमुळे नेहमीच लोकांचे आवडते राहिले आहेत. राज ठाकरेंचं कोपरखळ्या असणारं भाषण अनेकांना आवडतं.राज ठाकरे आता OTT माध्यमावर पदार्पण करत आहेत. राज ठाकरे आणि राहुल महाजन एकत्र एक खास शो घेऊन येणार आहेत. या शोची राज ठाकरे यांच्या हस्ते ग्रँड ओपनिंग झालीय.राहुल महाजन यांच्यासोबत मसाला चाय या शो मध्ये राज ठाकरे सहभागी होणार आहेत. या शो मध्ये राज ठाकरे यांनी राजकारण विषयीक चर्चा बाजूला ठेवल्या आहेत.या टॉक शो मध्ये राज ठाकरे यापूर्वी कधीही दिसले नाहीत अशा मोकळ्या ढंगात बोलताना दिसणार आहेत.राहुल महाजन या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळत आहेत. राजीव श्रीवास्तव दिग्दर्शित मसाला चाय हा शो स्टोरीडेक (storydek) या OTT प्लॅटफॉर्मवर LIVE बघायला मिळणार आहे.साधारण अर्ध्या तासांच्या या आकर्षक टॉक शोमध्ये.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) संस्थापक अध्यक्ष, राज ठाकरे यांनी राहुल महाजन यांच्याशी त्यांच्या आयुष्यातील अशा पैलूंबद्दल बोलले ज्यावर त्यांनी आजवर कधीही भाष्य केले नाही.

त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या इतर गोष्टींबद्दल दिलखुलासपणे सांगितले. राहुल महाजन यांनी राजकरणापलीकडे असलेल्या राज ठाकरेंची माणूस म्हणून नव्याने ओळख करून दिली.मसाला चाय या टॉक शोचा पहिला सिझन ६ भागांचा असणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राजीव श्रीवास्तव या टॉक शोचं दिग्दर्शन केलंय.या शोच्या पहिल्या सीझनमध्ये रितेश देशमुख, जेनेलिया डिसूझा देशमुख, जावेद अख्तर, राजपाल यादव, समीर अंजान आणि आता राज ठाकरे अशी लोकप्रिय व्यक्तीमत्व सहभागी होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने