पोलीस व्हायचं स्वप्न अधुरं! मैदानी चाचणीदरम्यान तरुणाचा मृत्यू

नवी दिल्ली : पोलीस व्हायचं स्वप्न उरी बाळगलेल्या एका तरुणाचा भरती दरम्यान मैदानी चाचणीदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या भरती कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. या घटनेची नोंद पोलिसांत झाली असून याची चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे.एएनआयच्या माहितीनुसार, गणेश उत्तम उगले (वय २६) या तरुणाची मुंबईत पोलीस भरतीदरम्यान मैदानी चाचणी होती. यावेळी १६०० मीटर रनिंगदरम्यान गणेशला भोवळ आली आणि तो मैदानातच कोसळला. त्यानंतर तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं.दरम्यान, तरुणाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळं झाला हे अद्याप समोर आलेलं नाही. पण या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रकरणाची पोलिसांत नोंद करण्यात आली असून याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. चौकशीनंतर मृत्यूचं खरं कारण समोर येईल, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने