'या' 4 इस्लाम राष्ट्रांत 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्यास मनाई

दिल्ली : व्हॅलेंटाईन डे आला की सर्व प्रेमवीर जागे होत असतात. त्यांच्यासाठी हा एक आनंदोत्सवच असतो. आपल्या खास मैत्रिणीला भेटून तिला लग्नाची किंवा प्रेमाची मागणी घालायची आणि हा प्रेमाचा एक आठवडा साजरा करायचा असं ठरलेलं असतं. भारतात व्हॅलेंटाईन डे ची क्रेझ असते. तर जगातील काही देशांमध्ये यावर बंदी घालण्यात आली आहे.देशातील काही इस्लाम राष्ट्रांमध्ये महिलांवर अनेक बंधणे घातले आहेत. त्यांचे शिक्षण, नोकरी, राहणीमान यावर अनेक बंधने घातली गेली आहेत अशा देशांमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हे चार इस्लामिक राष्ट्र कोणती आहेत ते आपण सविस्तर जाणून घेऊयात...इंडोनेशिया

या देशामध्ये व्हॅलेंटाईन डे च्या विरोधात कोणताही कायदा नाही पण तिथे हा उत्सव साजरा केला जात नाही. मुस्लीम कायदे यासाठी परवानगी देत नाहीत म्हणून व्हॅलेंटाईन साजरा करण्यास येथे मनाई आहे.

इरान

हा एक मुस्लीम देश असून येथे धर्मगुरूंची सत्ता असते. सरकारने येथे अशा गोष्टीवर बंदी घातली आहे.

पाकिस्तान

पाकिस्तानमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास आणि टीव्हीवर लाईव्ह कव्हरेज दाखवण्यास बंदी घालण्यात आली आहे. या गोष्टीला इस्लामच्या विरोधी मानलं जातं.

मलेशिया

हा देशही मुस्लीम बहुल देश असून इथे साल २००५ पासून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने