कुछ बडा होनेवाला है! युद्धाच्या वर्षपूर्तीपूर्वीच बायडेन युक्रेनमध्ये दाखल

रशिया: रशिया आणि युक्रेन युद्धाला येत्या २४ फेब्रुवारीला वर्ष होणार आहे.दोन्ही देशांमधील युद्ध २४ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू झाले होते. येत्या २४ फेब्रुवारीला या गोष्टीला वर्षपूर्ण होणार आहे. मात्र, वर्षपूर्तीपुर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन युक्रेनची राजधानी किव्हमध्ये दाखल झाले आहेत.यावेळी बायडेन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पोलंडला जाणार होते. मात्र, अचानक त्यांच्या कार्यक्रमात मोठा बदल करत बायडेन यांनी पोलंडला जाण्यापूर्वी युक्रेनची राजधानी किव्हमध्ये दाखल झाले आहेत.दोन्ही देशांमध्ये गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीला युद्ध सुरू झाले होते. या गोष्टीला आता वर्ष होणार आहे. त्याच्या तीन दिवस आधीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी किव्हला भेट दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.दरम्यान, बायडेन आणि झेलेन्स्की यांच्या भेटीचे काही छायाचित्रेदेखील समोर आली असून, यामध्ये बायडेन आणि झेलेन्स्की सोबत दिसत असल्याचे सांगितले जात आहे.या दोन्ही नेत्यांच्या भेटीदरम्यान, विविध मुद्द्यांसह एका मोठ्या योजनेवर चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.यापूर्वी, झेलेन्स्कींनी २१ डिसेंबर रोजी वॉशिंग्टन डीसीच्या ऐतिहासिक भेटीदरम्यान बायडेन यांची भेट घेतली होती. झेले झेलेन्स्कींची ही युद्ध सुरू झाल्यापासून पहिलाच परदेश दौरा होता. त्यानंतर आता स्वतः बायडेन किव्हमध्ये दाखल झाल्यामुळे येत्या काळात मोठं काही तरी घडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने