लग्न झालं आणि राज-कावेरीनं घेतला फर्मास उखाणा.. असा की तुम्हीही..

मुंबई: सध्या कलर्स मराठी वरील 'भाग्य दिले तु मला' ही मालिका बरीच चर्चेत आहे. कारण ज्या क्षणाची सारेजण आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आता जवळ आला आहे, म्हणजे आज आणि कावेरी विवाह बंधनात अडकणार आहे. नुकतेच या विशेष भागाचे चित्रीकरण पार पडले. यावेळी राज आणि कावेरीने एक फर्मास उखाणा घेतला, ज्याची आता जोरदार चर्चा होत आहे.ज्या क्षणाची वाट राज कावेरीसोबत अख्खा महाराष्ट्र बघत होता तो क्षण आता जवळ आला आहे. राज कावेरीच्या हळूवार प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आणि हे दोघे कधी एकत्र येणार याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना लागून राहिली होती. अखेर त्यांचे लग्न धुमधडाक्यात पार पडले, याचे प्रक्षेपण 26 फेब्रुवारीच्या विशेष भागात होणार आहे.एकीकडे स्वत:ची संस्कृती जपण्याचा ध्यास असणारी आणि परंपरेचा डोळस अभिमान बाळगणारी कावेरी तर दुसरीकडे नाविन्याची कास असणारा राजवर्धन एकेमकांना समोर आले आंणि दोघांमध्ये हळुवार प्रेम फुलत गेले.कावेरी आणि राजवर्धनच्या या गोष्टीमध्ये अनेक अनपेक्षित वळण आली, कधी गैरसमज तर कधी प्रेम तर कधी भांडणाची वादळ, कधी दुरावा… एकमेकांच्या साथीने सगळ्यांशी लढत आता तो शुभ दिवस आला आहे.राज - कावेरी यांचा विवासोहळा आनंदात पार पडणार आहे लग्नासाठी कावेरीचा खास मराठमोळा लूक असणार आहे नऊवारी, नथ, शेला, हिरवा चुडा या लुकमध्ये कावेरी खूप सुंदर दिसत आहे. दोघांचाही अस्सल मराठमोळा बाज दिसून येणार आहे. लग्न पारंपरिक पध्दतीने पार पडणार आहे.

नुकतेच या भागाचे चित्रीकरण झाले, यावेळी कावेरी आणि राज यांनी एकमेकांसाठी भन्नाट उखाणे घेतले. कावेरी म्हणते, 'कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून.. राजवर्धन रावांचे नाव घ्याची सुरुवात होतेय आजपासून'तर राज मात्र एकदम विनोदी उखाणा घेतो, राज म्हणतो, 'लग्नासाठी स्थळ पाहताना आई तुझ्यावरच अडली, नशीब माझं फुटकं की कावेरी गळ्यात पडली..' राजचा हा उखाणा ऐकून सर्वांनाच हसू आलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने