"मोदी, शाह यांनी सतत दौरे करण्यापेक्षा मुंबईतच 2 BHKचा फ्लॅट घ्यावा"

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई आणि पुण्यातील दौऱ्यामध्ये वाढ झाली आहे. त्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला आहे.मोदी आणि शाह यांनी सतत मुंबईत येण्यापेक्षा त्यांनी मुंबईतच एखादा 2 बीएचकेचा फ्लॅट घेऊन इथेच राहावं, असं सुषमा अंधारे यांनी म्हंटलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची धास्ती घेतल्यामुळे मोदी आणि शाह यांचे मुंबईतील दौरे वाढले आहेत. धास्तीमुळेच कंठघोष केला जात आहे. त्यांनी सतत दौरे करण्यापेक्षा मुंबईतच 2 BHKचा फ्लॅट घ्यावा, असंही सुषमा अंधारे यांनी म्हंटलं आहे.तर गेल्या काही दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 वेळा दौरा केला. यावेळी त्यांनी अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं आहे. सत्ताधारी विरोधक यांच्या या दौऱ्यामुळे चांगलीच खडाजंगी दिसून आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्यात वाढ झाल्याचे विरोधकांनी म्हंटलं आहे.तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत येऊन अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं आहे. त्यातही विरोधकांना राजनीति दिसून येते. विकासकामांकडे लक्ष्य द्या म्हणत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. तर पुण्यातील कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर असणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने