अदानींना त्यांनी 'हग' केलयं मग आता गायींचं काय? संजय राऊतांचा 'काऊ हग डे'वरुन मोदींना टोला

मुंबई : येत्या व्हॅलेंटाईन डे दिनी 'काऊ हग डे' साजरा करण्याचं परिपत्रक केंद्र सरकारनं काढलं आहे. यावरुन आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. अदानीला त्यांनी हग केलंय मग आता दुसऱ्या काऊचं देशात काय राहिलं, अशा शब्दांत राऊतांनी मोदींवर टीका केली आहे. राऊत म्हणाले, "'काऊ हग डे'कडं बघण्याची आमची इच्छाचं नाही. कारण पंतप्रधान मोदी सध्या अदानींना हग करुन बसले आहेत. एवढ्या मोठ्या काऊला त्यांनी हग केल्यावर दुसऱ्या काऊचं काय राहिलं या देशात! आता आम्हाला अदानीला हग करता येत नाही, यासाठी त्यांनी गायी सोडलेल्या आहेत. पण गाई गोमाता आहे आणि आम्ही तिचा आदर करतो"

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने