कोण आहेत मुकेश अंबानींचे गुरु? ज्यांच्या सल्ल्याने घेतला जातो प्रत्येक लहान मोठा निर्णय

मुंबई: मुकेश अंबानी यांचेही नाव देशातील आणि जगातील सर्वात मोठ्या उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट आहे. व्यवसायाच्या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा दबदबा कायम आहे. असे म्हणतात की जीवनात यश मिळवण्यासाठी गुरु असणे अत्यंत आवश्यक आहे. असेच एक गुरु अंबानी कुटुंबातील आहेत, त्यांचे नाव रमेश भाई ओझा आहे. अंबानी कुटुंब प्रत्येक लहान-मोठा निर्णय त्यांच्या सल्ल्याने घेते. चला, जाणून घेऊया त्यांच्याबद्दल.अंबानी कुटुंबाचे गुरू रमेश भाई ओझा हे एक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु आहेत. ते गुजरातमधील पोरबंदरमध्ये एक आश्रम चालवतात, ज्याचे नाव 'सांदिपनी विद्यानिकेतन आश्रम' आहे.धीरूभाई अंबानी जेव्हा यशाच्या शिखरावर होते तेव्हापासून रमेश भाई ओझा अंबानी कुटुंबासोबत आहेत. अंबानी कुटुंबासाठी त्यांचे महत्त्व अतुलनिय आहे. कुटुंबाच्या प्रत्येक लहान-मोठ्या निर्णयात रमेश भाई ओझा यांचा सल्ला महत्वाचा असतो.असे म्हटले जाते की मुकेश अंबानी आपल्या व्यवसायात कोणतीही नवीन गोष्ट करण्यापूर्वी आपल्या गुरूचा सल्ला घेतात. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यात बिझनेसबाबत चढ-उतार होत होते, तेव्हा त्यांच्या गुरूंनीच योग्य मार्ग दाखवला होता.असे म्हणतात की धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी कोकिलाबेन अनेकदा त्यांचे व्हिडिओ पाहत असत. त्यांच्यामुळे प्रभावित होऊन 1997 मध्ये त्यांनी रमेश भाई ओझा यांना त्यांच्या घरी 'राम कथा' आयोजित करण्यासाठी आमंत्रित केले. आठवडाभरानंतर त्यांचे अंबानी कुटुंबाशी संबंध सुधारले होते. हळूहळू ते या घराण्याचे गुरू झाले.केवळ अंबानी कुटुंबच नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे सर्व मोठे नेते त्यांच्या आश्रमात गेले आहेत. त्यांचे आश्रय आणि त्यांचे नाव देशभरात प्रसिद्ध आहे. त्यांच्या आध्यात्मिक विचारांनी प्रभावित होऊन सातासमुद्रापलीकडूनही त्यांचे भक्त त्यांना भेटायला येतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने