'बघितलंस आनंदा आपल्या एकनाथाने...', पुण्यात शिंदे गटाकडून बॅनरबाजी!

मुंबई:   केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काल (शुक्रवारी) शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला आहे. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटालाच दिलं. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आता शिवसेना हे पक्षचिन्हं आणि नाव दिल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण चिन्हं आणि शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.तर पुण्यामध्ये सर्वात जास्त लक्ष एका बॅनरने वेधून घेतलं आहे. शिंदे गटाकडून पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे स्वर्गातून आशीर्वाद देत असल्याचे बॅनर पुण्यात झळकले आहेत. तर त्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून गहाण असलेला धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांनी सोडवला अशा स्वरूपाचा मजकूर या बॅनरवर लिहण्यात आला आहे. या बॅनरमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.हे बॅनर पुण्यात झळकले आहेत. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पुण्यामध्ये शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष दिसून आला होता. त्यातच आता या बॅनरची भर पडली आहे. यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष दिसून येण्याची शक्यता आहे.

तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडूनही मातोश्रीबाहेर काही बॅनर लावण्यात आले होते. त्यामध्ये काही झालं तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत असं आश्वासन देणारे बॅनर दिसून आले तर “काल, आज आणि उद्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत” यासह “ठाकरे परिवार आणि असंख्य शिवसैनिक हेच आमचे पंढरपूर आणि मातोश्री हीच आमची चंद्रभागा, उद्धव साहेब हेच आमचे विठ्ठल”, असंही काही बॅनरवर लिहण्यात आलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने